हिंदी

(1) आकृती पूर्ण करा: दाजीसाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये (2) रघुभैयाने चिठ्ठी मोठ्याने वाचली. चिठ्ठीतला मजकूर ऐकून अब्दुल आणि शन्नू यांना खूपच आनंद झाला. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

उत्तार्‍याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

(1) आकृती पूर्ण करा:           (2)

रघुभैयाने चिठ्ठी मोठ्याने वाचली. चिठ्ठीतला मजकूर ऐकून अब्दुल आणि शन्नू यांना खूपच आनंद झाला. तपोवनात होणाऱ्या संमेलनाच्या प्रसंगी अब्दुलचा खास सत्कार होणार होता आणि त्यासाठी पत्र पाठवून दाजीसाहेबांनी त्याला निमंत्रण दिले होते. दोन दिवसांनीच सत्कार समारंभ होता. कधीही लाभणार नाही असे सत्काराचे भाग्य त्याच्या वाट्याला आले होते. पत्र आल्यापासून तो त्याच आनंदात होता. पुन्हा पुन्हा तो स्वत:च स्वत:ला विचारत होता, सत्कार करण्याएवढे मी काय केले आहे तपोवनासाठी?

अब्दुल तपोवनात आला तेव्हा कार्यक्रम सुरू झाला होता. स्टेजच्या समोर, बाजूला मांडलेल्या खुर्च्यांवर काही निमंत्रित पाहुणेमंडळी बसली होती. अब्दुलला त्यांच्याबरोबर बसायला संकोच वाटला. तो तसाच उभा राहिला. तेवढ्यात खुद्द दाजीसाहेबांनीच त्याला बोलावून जवळच्या खुर्चावर बसायला लावले. सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला सुरुवात झालो. सुरुवातीचे अध्यक्षांचे स्वागत वगैरे औपचारिक झाल्यावर दाजीसाहेबांनी बोलायला सुरुवात केली. अब्दुल बघतच राहिला, चौऱ्याऐंशी वर्षांच्या वृद्धाचा ताठपणा, उंच सडसडीत देहयष्टी, तेज:पुंज चेहरा, गौरवर्ण, पांढरेस्वच्छ धोतर, त्यावर बंद गळ्याचा कोट आणि डोक्याला केशरी फेटा. या वयातही आवाजातला खणखणीतपणा आणि बोलण्यातली ऐट यामुळे अब्दुल भारावून बघत राहिला.

(2) कोण ते लिहा:          (2)

  1. मोठ्याने चिठ्ठी वाचणारा -
  2. अब्दुलला पत्र पाठवणारे -

(3) स्वमत:       (3)

'अब्दुल संवेदनशील मनाचा होता', हे विधान पाठाच्या आधारे सोदाहरण पटवून दया.

आकलन

उत्तर

(1)

(2) 

  1. मोठ्याने चिठ्ठी वाचणारा - रघुभैया
  2. अब्दुलला पत्र पाठवणारे - दाजीसाहेब

(3) 

अब्दुलमियाँ संक्रांती आणि ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी न चुकता तपोवनात जात असे. तेथे तो स्त्रिया आणि मुलींना मोफत बांगड्या भरत असे. त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारा आनंद पाहून त्याला मनःपूर्वक समाधान मिळत असे, यावरून त्याची समाजसेवेची निःस्वार्थ भावना स्पष्ट होते. या सणाच्या काळात तो गावात बांगड्या विकून मोठा नफा कमावू शकला असता, पण त्याने कधीच स्वार्थी विचार केला नाही. यावरूनच हे दिसून येते की, समाजसेवा करणे त्याला अधिक आनंददायी वाटत असे. तो स्वभावाने साधा, सात्त्विक आणि निरागस होता. केवळ प्रतिष्ठेसाठी त्याने समाजसेवेचे व्रत घेतले नव्हते. त्यामुळे 'अब्दुल संवेदनशील मनाचा होता' तसेच 'अब्दुल एक थोर समाजसेवक होता' हे विधान योग्य ठरते.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (July) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×