Advertisements
Advertisements
प्रश्न
(१) चौकटी पूर्ण करा.
(i) सर्वकाळ सुखदाता -
(ii) तात्पुरती तहान भागविणारे -
(iii) अभंगात वर्णन केलेला, चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी -
(iv) पिलांना सुरक्षितता देणारे -
जेवीं चंद्रकिरण चकोरांसी । पांखोवा जेवीं पिलीयांसी ।
जीवन जैसे कां जीवांसी । तेवीं सर्वांसी मृदुत्व ।।
जळ वरिवरी क्षाळी मळ । योगिया सबाह्य करी निर्मळ ।
उदक सुखी करी एक वेळ । योगी सर्वकाळ सुखदाता ।।
उदकाचें सुख तें किती । सवेंचि क्षणें तृषितें होती ।
योगिया दे स्वानंदतृप्ती । सुखासी विकृती पैं नाही ।।
उदकाची जे मधुरता । ते रसनेसीचि तत्त्वतां ।
योगियांचे गोडपण पाहतां । होय निवविता सर्वेंद्रियां ।।
मेघमुखें अध:पतन । उदकाचें देखोनि जाण ।
अध:पातें निवती जन । अन्नदान सकळांसी ।।
तैसे योगियासी खालुतें येणें । जे इहलोकीं जन्म पावणें ।
जन निववी श्रवणकीर्तनें । निजज्ञानें उद्धरी ।।
(2) तुलना करा.
योगीपुरुष | पाणी |
(३) योगी पुरुषाचे श्रेष्ठत्व तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
(४) ‘सर्वकाळ सुखदाता’ असे योगी पुरुषास म्हणण्याची कोणती कारणे असावीत, असे तुम्हांस वाटते?
उत्तर
(१) चौकटी पूर्ण करा.
(i) सर्वकाळ सुखदाता - योगीपुरुष
(ii) तात्पुरती तहान भागविणारे - पाणी/जीवन
(iii) अभंगात वर्णन केलेला, चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी - चकोर
(iv) पिलांना सुरक्षितता देणारे - पक्षिणीचे पंख
(2) तुलना करा.
योगीपुरुष | पाणी |
१. योगीपुरुष त्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीला अंतर्बाह्य निर्मळ करतो. |
१. पाणी फक्त बाह्यांग निर्मळ करते. |
२. योगीपुरुष स्वानंदतृप्तीचा अनुभव करून देतो. त्याच्या सहवासात आल्यानंतर मिळणारे सुख सर्वकाळ टिकून राहते. | २. पाणी प्यायल्यानंतर मिळणारे सुख क्षणिक असते. ते मर्यादित काळच टिकून राहते. |
(३) योगी सर्वकाळ सुखदाता' ही एकनाथी भागवतातील संत एकनाथांची रचना योगीपुरुषाची लक्षणे स्पष्ट करते. यात योगीपुरुष व पाण्याची तुलना करून योगीपुरुष पाण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे, हे विविध उदाहरणे देऊन संत एकनाथ पटवून देतात.
जगण्यासाठी सजीवांना पाण्याची आवश्यकता असते. त्यांच्याकरता पाणी हेच जीवन असते. प्रत्येक गोष्टीकरता त्यांना पाण्याची गरज भासते; मात्र पाणी फक्त बाह्यांग स्वच्छ करू शकते, ते आपले अंतरंग स्वच्छ करू शकत नाही; परंतु योगीपुरुष मात्र त्याच्या संपर्कात येणाऱ्या सर्वांना अंतर्बाह्य शुद्ध, निर्मळ करतो. तहानलेल्या जीवाला पाणी प्यायल्यावर मिळणारे सुख हे तात्पुरते असते. ते सुख चिरकाल टिकत नाही. हा सुखाचा अनुभव पुन्हा तहान लागेपर्यंतच टिकतो. योगीपुरुष मात्र त्याच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाला कधीही न संपणाऱ्या स्वानंदाचा अनुभव देतो.
(४) पाण्यामुळे तहानलेल्या जीवाला मिळणारे सुख क्षणभर टिकते; मात्र योगीपुरुषाचा सहवास सर्वकाळ सुख देणारा असतो. योगीपुरुषाच्या वाणीतून, उपदेशातून मिळणारा आत्मानंद चिरकाळ सुख मिळवून देतो.
पाण्याचा गोडवा हा फक्त जिभेला सुखावतो; मात्र योगीपुरुषाच्या मधुर वाणीमुळे सवेंद्रिय सुखावतात.