Advertisements
Advertisements
प्रश्न
आचार्य अत्रे यांच्या 'आजीचे घड्याळ' या कवितेतील आजीचे घड्याळ नेमके कोणते ते शोधा. ही कविता इंटरनेट किंवा ग्रंथालयातील संदर्भ साहित्यातून शोधा.
उत्तर
आजीचे घडयाळ
आजीच्या जवळी घडयाळ कसले आहे चमत्कारिक,
देई ठेवुनि तें कुठे अजुनि हे नाही कुणा ठाऊक;
त्याची टिक टिक चालते न कधिही, आहे मुके वाटते,
किल्ली देई न त्यास ती कधि, तरी ते सारखे चालते
“अभ्यासास उठीव आज मजला आजी पहाटे तरी”,
जेव्हा मी तिज सांगुनी निजतसे रात्री बिछान्यावरी
साडेपाचही वाजतात न कुठे तो हाक ये नेमकी
“बाळा झांजर जाहले,अरवला तो कोंबडा, ऊठ की !”
ताईची करण्यास जम्मत, तसे बाबूसवे भांडता
जाई संपुनियां सकाळ न मुळी पत्त कधी लागता!
“आली ओटीवरी उन्हे बघ!” म्हणे आजी,”दहा वाजले!
जा जा लौकर!” कानि तो घणघणा घंटाध्वनी आदळे.
खेळाच्या अगदी भरांत गढुनी जाता अम्ही अंगणी
हो केव्हा तिनिसांज ते न समजे! आजी परी आंतुनी
बोले, “खेळ पुरे, घरांत परता! झाली दिवेलागण,
ओळीने बसुनी म्हणा परवचा ओटीवरी येउन!”
आजीला बिलगून ऐकत बसू जेव्हा भुतांच्या कथा
जाई झोप उडून, रात्र किती हो ध्यानी न ये ऐकता !
“अर्धी रात्र कि रे” म्हणे उलटली, ”गोष्टी पुरे! जा पडा!”
लागे तो धिडधांग पर्वतिवरी वाजावया चौघडा
सांगे वेळ,तशाच वार-तिथीही आजी घडयाळातुनी
थंडी पाऊस ऊनही कळतसे सारें तिला त्यांतुनी
मौजेचे असले घड्याळ दडुनी कोठे तिने ठेविले?
गाठोडे फडताळ शोधुनि तिचे आलो! तरी ना मिळे!