Advertisements
Advertisements
प्रश्न
आधुनिक इतिहासलेखन पद्धतीची चार वैशिष्ट्ये कोणती?
टिप्पणी लिखिए
उत्तर
आधुनिक इतिहासलेखन पद्धतीची चार वैशिष्ट्ये
- या शास्त्रशुद्ध पद्धतीची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते.
- हे प्रश्न मानवकेंद्रित असून भूतकालीन मानवी समाजघटकांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात, त्या कृतीचा संबंध दैवी घटनांशी वा कथा कहाण्यांशी जोडलेला नसतो.
- या प्रश्नांच्या उत्तरांना इतिहासातील विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असल्याने त्यांची मांडणी तर्कसंगत असते.
- मानवाने केलेल्या भूतकालीन कृतीच्या आधारे इतिहासात मानवजातीच्या वाटचालीचा वेध घेतला जातो.
shaalaa.com
आधुनिक इतिहासलेखन
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?