Advertisements
Advertisements
प्रश्न
आकृतीत दिलेल्या माहितीवरून आयताची लांबी आणि रुंदी सेंटीमीटरमध्ये काढा.
योग
उत्तर
दिलेला चौकोन `square`ABCD हा आयत आहे.
∴ AB = CD ...[आयताच्या समोरासमोरील बाजू]
∴ 5m + n = 2m + 3n + 5
∴ 3m − 2n = 5 ...(i)
शिवाय, AD = BC
∴ m + n − 3 = 3m − 2n + 7
∴ −2m + 3n = 10 ...(ii)
समीकरण (i) ला 3 ने गुणून आणि समीकरण (ii) ला 2 ने गुणून,
9m − 6n = 15 ...(iii)
−4m + 6n = 20 ...(iv)
समीकरण (iii) आणि (iv) यांची बेरीज करून,
5m = 35
∴ m = 7
m = 7 ही किंमत समीकरण (ii) मध्ये ठेवून,
−2(7) + 3n = 10
∴ 3n = 24
∴ n = 8
आता, AB = 5m + n
= 5(7) + 8
= 35 + 8
= 43 सेमी
AD = m + n − 3
= 7 + 8 − 3
= 12 सेमी
∴ आयताची लांबी आणि रूंदी अनुक्रमे 43 सेमी आणि 12 सेमी आहे.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?