Advertisements
Advertisements
प्रश्न
आम्ल पर्जन्यामुळे प्रदूषित झालेली माती पुन्हा सुपिक कशी केली जाते?
उत्तर
- आम्ल पर्जन्यामुळे प्रदूषित झालेली माती पुन्हा सुपीक करण्यासाठी जीवाणूंच्या विशिष्ट जाती वापरल्या जातात.
- स्वच्छ तंत्रज्ञान या पद्धतीत ॲसिडबॅसिलस फेरोऑक्सिडन्स व ॲसिडोफिलीयम या जीवाणू प्रजाती यासाठी वापरल्या जातात.
- आम्ल पर्जन्यामध्ये सल्फ्युरिक आम्ल असते. या जिवाणूसाठी हे सल्फ्युरिक आम्ल ऊर्जास्रोत आहे.
- अशा जीवाणूंचा समूह वापरून आम्लपर्जन्यामुळे होणारे भू-प्रदूषण आटोक्यात आणले जाते. अशा रीतीने आम्ल पर्जन्यामुळे प्रदूषित झालेली माती पुन्हा सुपीक केली जाते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
समुद्र किंवा नदीच्या तेलाचे तवंग कसे नष्ट केले जातात?
ॲसिडीफिलीयम प्रजाती या जीवाणूंसाठी सल्फ्युरिक आम्ल हा ऊर्जास्रोत आहे.
मानवनिर्मित रसायनांचा नाश करण्याची क्षमता सूक्ष्मजीवात नैसर्गिकरित्याच आढळते.
युरेनिअम अविद्राव्य क्षारांत रूपांतर करणारे सूक्ष्मजीव कोणते?
शास्त्रीय कारणे लिहा.
समुद्रातील तेलगळतीमुळे होणाऱ्या दुष्परिणामांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो.
दिलेल्या उताऱ्यातील गाळलेल्या जागा योग्य पर्याय निवडून पूर्ण करा.
[ऑक्सिजन, पिरिडिन्स, यांत्रिक, CO2, पेट्रोलिअम, घातक, पॉलिस्टर, नॉर्काडीया]
समुद्रात विविध कारणांनी ______ तेलाची गळती होते. हे तेल जलचरांसाठी ______, विषारी ठरू शकते. पाण्यावर आलेला तेलाचा तवंग ______ पद्धतीने दूर करणे सोपे नाही. पण अल्कॅनिव्होरॅक्स बॉरक्युमेन्सिस व स्युडोमोनास जीवाणूंमध्ये ______ व इतर रसायने नष्ट करण्याची क्षमता आहे. त्यामुळे तेलाचे तवंग नष्ट करायला या जीवाणूंच्या समूहाचा वापर केला जातो. त्यांना H.C.B म्हणतात. H.C.B हे हायड्रोकार्बनचे अपघटन करून त्यातील कार्बनचा ______ संयोग घडवून आणतात. या अभिक्रियेत ______ व पाणी तयार होते.