Advertisements
Advertisements
प्रश्न
दिलेल्या उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
आणि मी प्रामाणिकपणे सांगतो, की दहा-बारा वर्षांपूर्वी दंतवैद्याबद्दलच्या खऱ्याखुऱ्या दंतकथा ऐकल्या होत्या, त्यावरून दंतवैद्याची खुर्ची, दात उपटण्याची क्रिया इत्यादी सर्व गोष्टींबद्दल माझ्या मनात विक्राळ भीती होती; पण प्रत्यक्षात तसे काही वाटले नाही. दंतवैद्य अलीकडे फारच माणसाळलेले आहेत असे माझे प्रामाणिक मत झाले. त्याने माझ्या हिरड्यांत इंजेक्शन देऊन इतका लीलया दात उपटला, की मी आश्चर्यचकित होऊन पाहतच राहिलो! दात उपटण्याची क्रिया इतकी सोपी असेल असे वाटले नव्हते. मी आजवर शत्रूंना आणि शेजाऱ्यांना भांडणाच्या वेळी ‘दात उपटून हातात ठेवीन’, ‘दात घशात घालीन’ अशा माझ्या शक्तीचे प्रदर्शन करणाऱ्या धमक्या दिल्या होत्या. त्यांना काहीच अर्थ नव्हता, याची हळहळ दंतवैद्याच्या खुर्चीत असतानाच वाटली. दंतवैद्याने दात दाखवला. हाच तो खलदंत! ज्याने माझे बायकोपुढे हसे केले तोच हा नीच दात. नतद्रष्ट! ‘तुला हेच शासन योग्य आहे’ असे मी उरलेले दातओठ खाऊन मनाशी म्हणालो. आता पुन्हा तो ठणका लागणार नाही, पुन्हा ते बोळे धरावे लागणार नाहीत. पुन्हा बायकोचा उपदेश ऐकावा लागणार नाही. ह्या विचारांनी मी आनंदाने बेहोश झालो. उरलेल्या दातांना धाक बसावा म्हणून तो काढलेला दात घरी नेण्याचा विचार मनात येऊन गेला; पण त्या दाताची संगतसुद्धा नको असे वाटून मी तो दंतवैद्यालाच अर्पण केला. आनंदाने घरी आलो. दारातूनच ओरडून चार-पाच शेजाऱ्यांना सांगितले, की ‘‘तो तुम्हांला जागवणारा दात गेला. यापुढे दंतसप्ताह नाही.’’ |
(१) (२)
(i)
(ii)
(२) दंतवैद्याने दात काढल्यानंतर लेखक आश्चर्यचकित का झाले? (२)
(३) स्वमत अभिव्यक्ती: (४)
लेखकाच्या मनातील दंतवैद्याविषयाची प्रतिक्रिया तुमच्या भाषेत लिहा.
किंवा
लेखकाने शेजाऱ्यांना ओरडून काय सांगितले? उदाहरणासह लिहा.
उत्तर
(१) (i)
(ii)
(२) दातदुखीच्या सततच्या त्रासामुळे लेखकाने दंतवैद्याशी चर्चा करून दुखणारा दात काढून टाकण्याचा निर्णय घेतला असला व लेखकाच्या या निर्णयाशी दंतवैद्य सहमत असले तरी लेखकाच्या मनात दंतवैद्याविषयी अनेक प्रश्न, शंका होत्या. कारण लेखकाने दहा-बारा वर्षांपूर्वी दंतवैद्याबद्दलच्या दंतकथा ऐकल्या होत्या. दंतवैद्याची खुर्ची, दात उपटण्याची प्रक्रिया याबद्दल लेखकाच्या मनात भीतीही होती. परंतु दात काढत असताना प्रत्यक्ष असे काहीच घडले नाही. महत्त्वाचे म्हणजे दंतवैद्य अलीकडे माणसाळलेले असल्याचे लेखकाच्या लक्षात आले. कारण दंतवैद्याने लेखकाच्या हिरड्यांत इंजेक्शन देऊन लीलया दात उपटला त्यामुळे लेखकास आश्चर्य वाटले. दात उपटण्याची प्रक्रिया इतकी सोपी असेल असे लेखकास कधीच वाटले नाही.
(३) सुप्रसिद्ध लेखक, विनोदी लेखक, नाटककार वसंत सबनीस लिखित ‘दंतकथा’ हा विनोद ललितलेख ‘सबनीशी’ मधून घेतला आहे. दाताचे दुखणे हे त्रासदायक असून दातदुखीमध्ये कोणत्याही माणसाची अवस्था केविलवाणी होते आणि दातदुखीसारख्या गंभीर विषयातील प्रसंग लेखकाने विनोद शैलीत टिपले आहे.
लेखकाची सततची होत असणारी दातदुखी आणि या दातदुखीवर अनेक प्रकारचे उपचार करूनही दातदुखी थांबत नाही, शेवटी लेखक दंतवैद्याशी चर्चा करून दोघांच्या एकमताने दात काढून टाकण्याचा निर्णय घेतात. लेखकाच्या या निर्णवाशी दंतवैद्यही सहमत असले तरी लेखकाच्या मनात दंतवैद्याविषयी अनेक शंका होत्या. भीती होती. कारण लेखकाने दहा-बारा वर्षपूर्वी दंतवैद्याबद्दल काही दंतकथा ऐकल्या होत्या. त्यामुळे दंतवैद्याची खुर्ची, दान उपटण्याची क्रिया अशा गोष्टीबद्दल लेखकास भीती वाटते. परंतु लेखकाचा दात काढल्यानंतर लेखकाची दंतवैद्याविषयी काही प्रतिक्रिया उमटते ती पुढीलप्रमाणे-
- अलीकडे दंतवैद्य खूपच माणसाळलेले आहेत असे दंतवैद्याबद्दलच लेखकाचे प्रामाणिक मत.
- दंतवैद्याने लेखकाच्या हिरड्यात इंजेक्शन देऊन दुखणारा दात सहज उपटून काढल्याने लेखक आश्चर्यचकित होऊन पाहतच राहिले.
- दात काढण्याची प्रक्रिया इतकी सोपी असेल असे लेखकास वाटलेच नव्हते. अशाप्रकारे लेखकाच्या मनात दंतवैद्याविषयीची प्रतिक्रिया होती.
किंवा
सुप्रसिद्ध लेखक, नाटककार वसंत सबनीस लिखित ‘दंतकथा’ हा विनोदी लेख त्यांच्याच ‘सबनीशी’ मधून घेतला आहे. मानवी जीवनामध्ये प्रत्येकाच्या वाट्याला दातदुखी ही येतच असते. अशा दातदुखीमध्ये प्रत्येकाचीच केविलवाणी स्थिती होते. या केविलवाण्यास्थितीतून लेखकाचीही सुटका झाली नाही. असे असले तरी लेखकाने दातदुखीसारख्या गंभीर विषयाला नर्मविनोदी शैलीत मांडून सर्वानाच दातदुखीतील गमतीजमातींचा प्रत्यय आणून दिला आहे.
लेखकाची दातदुखी सुरू होताच शेजारीपाजाराही जमत असत, चौकशी करत, कोणते उपचार कसे करावेत या विषयीही सल्ले देत मात्र लेखकाची दातदुखी तात्पुरती कमी होई व नंतर पुन्हा दातदुखी सुरू होत असे त्यामुळे शेवटी लेखक दंतवैद्याशी चर्चा करून दात काढून टाकण्याचा निर्णय घेतात. दंतवैद्याबद्दल मनात भीती वाटत असली तरी दंतवैद्याने सहजपणे काढून टाकलेला दात पाहून लेखक आश्चर्यचकित होतात. खरेतर भांडणाच्या वेळी लेखक शत्रुंना वा शेजाऱ्यांना धमक्या देत असत की, ‘दात उपटून हातात ठेवीण, दात घशात घालीन’ परंतु दात काढून टाकल्यानंतर लेखकास समजते की अशा धमक्यांना काहीच अर्थ नव्हता मात्र दंतवैद्याने दात दाखवला आणि लेखकाने त्यास खलदंते, नीच दात, नतद्रष्ट अशा उपमा दिल्या. कारण याच दाताने लेखकाचे त्यांच्या बायकोपुढे हसे केले होते. आता मात्र पुन्हा दाताला ठगका लागणार नाही. उपचारास्तव पुन्हा दाताखाली बोळे धरावे लागणार नव्हते आणि बायकोचा उपदेश ही ऐकावा लागणार नव्हता या विचाराने लेखक आनंदी झाले खरे. शिवाय उरलेल्या दातांना धाक बसावा यासाठी काढलेला दात घरी न्यावा असेही लेखकास वाटते. पण दुसऱ्याक्षणी त्या दाताची संगतसुद्धा नको असे वाटल्याने लेखकाने तो दात दंतवैद्याकडेच ठेवला. लेखक घरी आनंदात आले आणि त्यांनी शेजाऱ्यांना आपल्या दारातूनच सांगितले की, ‘रात्री तुम्हाला जागवणारा दात गेला’, यापुढे दंतसप्ताह होणार नाही. असे ओरडून सांगितले. याचे कारण म्हणजे लेखकाची दातदुखी सुरू झाली की शेजाऱ्यांचेही जागरण होत असे. अशाप्रकारे आपल्या दाताविषयी लेखकाने शेजाऱ्यांना ओरडून सांगितले.