हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

अग्निशामकदलाच्या वाहनावर बसवलेली शिडी जास्तीत जास्त 70° मापाच्या कोनातून उचलता येते. त्यावेळी तिची अधिकात अधिक लांबी 20 मी असते. शिडीचे वाहनावरील टोक जमिनीपासून 2 मी उंचीवर आहे. तर शिडीचे दुसरे टोक - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

अग्निशामकदलाच्या वाहनावर बसवलेली शिडी जास्तीत जास्त 70° मापाच्या कोनातून उचलता येते. त्यावेळी तिची अधिकात अधिक लांबी 20 मी असते. शिडीचे वाहनावरील टोक जमिनीपासून 2 मी उंचीवर आहे. तर शिडीचे दुसरे टोक जमिनीपासून जास्तीत जास्त किती उंचीवर पोहोचवता येईल ? (sin 70° ≈ 0.94)

योग

उत्तर

 

समजा, AB ही शिडीची उंची आहे व AE ही शिडीच्या वाहनावरील टोकाची जमिनीपासूनची उंची आहे.

रेख AC ⊥ रेख BD काढा.

उन्नत कोन = ∠BAC = 70°

AB = 20 मीटर

AE = 2 मीटर

ΔABC या काटकोन त्रिकोणामध्ये,

sin 70° = `"BC"/"AB"` .............[व्याख्येप्रमाणे]

∴ 0.94 = `"BC"/20`

∴ BC = 0.94 × 20 

= 18.80 मीटर

`square "ACDE"` मध्ये,

∠E = ∠D = 90°

∠C = 90°  ...........[रेख AC ⊥ रेख BD]

∴ ∠A = 90° ........[`square "ACDE"` चा उर्वरित कोन]

∴ `square "ACDE"` हा आयत आहे. …....[प्रत्येक कोनाचे माप 90°]

∴ CD = AE = 2 मीटर ......[आयताच्या समोरासमोरील बाजू]

आता, BD = BC + CD ….........[B - C - D]

= 18.80 + 2

= 20.80 मीटर

∴ त्या शिडीचे दुसरे टोक जमिनीपासून जास्तीत जास्त 20.80 मीटर उंचीवर पोहोचवता येईल. 

shaalaa.com
त्रिकोणमितीचे उपयोजन (Application of trigonometry)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 6: त्रिकोणमिती - संकीर्ण प्रश्नसंग्रह 6 [पृष्ठ १३९]

APPEARS IN

बालभारती Geometry (Mathematics 2) [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
अध्याय 6 त्रिकोणमिती
संकीर्ण प्रश्नसंग्रह 6 | Q 9. | पृष्ठ १३९

संबंधित प्रश्न

12 मी रुंदीच्या रस्त्याच्या दुतर्फा समोरासमोर दोन इमारती आहेत. त्यांपैकी एकीची उंची 10 मी असून तिच्या छतावरून दुसरीच्या छताकडे पाहिले असता उन्नत कोन 60° मापाचा होतो, तर दुसऱ्या इमारतीची उंची किती?


दीपगृहावरून एका जहाजाकडे पाहताना निरीक्षकाला 30° मापाचा अवनत कोन करावा लागतो. जर दीपगृहाची उंची 100 मी असेल तर ते जहाज दीपगृहापासून किती अंतरावर आहे?


15 मी रुंदीच्या रस्त्याच्या दुतर्फा समोरासमोर दोन इमारती आहेत. त्यांपैकी एकीची उंची 12 मी असून तिच्या छतावरुन दुसरीच्या छताकडे पाहिले असता उन्नत कोन 30° चा होतो, तर त्या इमारतीची उंची किती ?


खालील प्रश्नासाठी उत्तराचा योग्य पर्याय निवडा.

जर ∠A = 30° तर tan 2A = ?


`(cos(90 - "A"))/(sin "A") = (sin(90 - "A"))/(cos "A")` = हे सिद्ध करा.


tan θ × A = sin θ, तर A = ?   


∆ABC मध्ये, cos C = `12/13` असून BC = 24, तर AC = ? 


जर sec A = `x + 1/(4x)`, sec A + tan A = 2x किंवा `1/(2x)` हे दाखवा. 


एक व्यक्ती एका मंदिरापासून 50 मी. अंतरावर उभा आहे. त्या व्यक्तीने मंदिराच्या कळसाकडे पाहिले असता 45° मापाचा उन्नत कोन तयार होतो. तर त्या मंदिराची उंची किती?


बाह्यस्पर्शी असलेल्या दोन वर्तुळाच्या त्रिज्या अनुक्रमे 5 सेमी व 3 सेमी असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती असेल?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×