Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयातील वृक्षारोपण कार्यक्रमाविषयी अहवाललेखन करा.
अहवालाचा उद्देश ______ अहवाल लेखनात सुस्पष्टता व नीटनेटकेपणा ______ वृक्षारोपण कार्यक्रमाविषयी वस्तुनिष्ठता ______ त्यात विश्वसनीयता ______ कार्यक्रमाच्या प्रत्येक बिंदूला आवर्जून घेणे.
उत्तर
वृक्षारोपण कार्यक्रम सन २०२०-२०२१ सन् २०२० या शैक्षणिक वर्षात ‘वृक्षारोपण कार्यक्रम’ मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ‘अश्वस्थ’ संस्थेचे अध्यक्ष आशुतोष राणे यांनी भूषविले. तर प्रमुख पाहुणे म्हणून भिलवडी ग्रामपंचायतीचे लाडके सरपंच संदीप पाठक उपस्थित होते. साला बादप्रमाणे याही वर्षीच्या वृक्षारोपण कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि स्थानिक ग्रामस्थही मोठ्या संख्येने उपस्थित होते. भिलवडी येथे कनिष्ठ महाविद्यालयात सर्वांच्या उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन सन्माननीय अध्यक्ष, प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते झाल्यानंतर महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर सरपंच संदीप पाठक यांनी सुमारे एकहजार रोपे सोबत आणलेली भिलवडी येथे गोरस गडाच्या परिसरात व कनिष्ठ महाविद्यालयात कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय आशुतोष राणे यांच्या हस्ते वृक्षारोपण केले. सन्माननीय प्रमुख पाहुणे, प्राचार्य यांनीही वृक्षारोपण केल्यानंतर ‘अश्वस्थ’ संस्थेच्या अध्यक्षांनी, २० सप्टेंबर हे जागतिक वृक्षारोपण दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. सर्व विद्यार्थ्यांनी मिळून वृक्षारोपण दिंडी काढली. त्यामध्ये सन्माननीय पाहुणे, अध्यक्ष, पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षकवृंद, विद्यार्थी, ग्रामस्थ सहभागी झाले होते. वृक्षारोपण दिंडी महाविद्यालयाच्या प्रांगणात येताच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे यांच्या समवेत सर्व विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले. दोन विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाबाबत मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांनी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती’ या अभंगातून वृक्षारोपणाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी एका सुरात वृक्षजोपासण्याची शपथ घेतली. कार्यक्रमात शेवटी विद्यार्थी प्रतिनिधी अनिकेत जाधव याने आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले व प्राचार्याच्या अनुमतीने कार्यक्रम संपन्न झाल्याचे जाहीर केले. दिनांक - २० सप्टेंबर, २०२०-२०२१ सचिव - नितीन देशमुख |