Advertisements
Advertisements
प्रश्न
ऐसीं अक्षरें रसिकें’ या रचनेचा भावार्थ तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर
मराठी भाषेचा गौरव करताना व शब्दांची महती सांगताना संत ज्ञानेश्वर म्हणतात.
कौतकास्पद असलेला माझा मराठीचा बोल (शब्द) अमृताशीही पैज जिंकणारा आहे. अशी रसाळ अक्षरे मी मराठीत निर्माण करीन.
या शब्दांची कोमलता इतकी आहे की त्यांच्यापुढे संगीताचे रंगही फिके पडतात. माझ्या शब्दांना इतका गंध आहे की त्यापुढे (फुलांच्या) सुगंधाचेही बळ तोकडे पडते, सुगंधाचेही गर्वहरण होते.
मराठी भाषेच्या रसाळपणाचा इतका मोह होतो की, कानांना जिभा फुटतात. श्रवणाला स्वाद येतो. शरीराचे सर्व अवयव (इंद्रिये) एकमेकांशी भांडू लागतात. प्रत्येक इंद्रियाला मराठी भाषा केवळ आपलीच आहे, असे वाटू लागते.
खरे म्हणजे, शब्द हा श्रवणाचा (ऐकण्याचा) विषय आहे. परंतु जीभ म्हणते की, तो रस (शब्द) माझा आहे. मला आस्वादायचा आहे. नाकाला तर शब्दांचा सुगंध येऊ लागतो. त्यामुळे नाक म्हणते शब्द हा माझा विषय आहे.
या रेखेच्या वाहणीचे (शब्दांचे) नवल असे की हे शब्दचित्र पाहून डोळ्यांची तृप्ती होते. डोळ्यांचे पारणे फिटते. डोळे म्हणतात की आमच्यासाठीच हे सौंदर्याचे भांडार खुले केले आहे.
जेव्हा संपूर्ण सार्थ शब्द उभा ठाकतो, तेव्हा मन त्याला आस्वादण्यासाठी शरीराबाहेर झेप घेते आणि हात त्याला मिठीत घ्यायला पुढे सरसावतात. हातांना आलिंगन दयावेसे वाटते.
अशा प्रकारे सर्व इंद्रिये आपापल्या परीने शब्दाला बिलगतात आणि 'शब्दही उत्तम प्रकारे सर्व इंद्रियांचे समाधान करतो. ज्याप्रमाणे एकटा सूर्य चराचराला उजळतो. त्याप्रमाणे माझ्या मराठी शब्दाचे असामान्य, अलौकिक असे व्यापकपण, विस्तार, अफाटपणा आहे. जाणकार रसिक लोकांना तर मराठी भाषा ही हरएक इच्छा पूर्ण करणाऱ्या चिंतामणी सारखी भावते, पसंतीस येते.
हे असो. तर मी या मराठी शब्दांची शिगोशीग ताटे भरली आहेत. त्यावर कैवल्यरस वाढला आहे. अशी निष्काम कर्मयोगाची मेजवानी मी तयार केली आहे. आता या नित्य नूतन आत्मप्रकाशाची समई (दीपज्योती) मी तेवत ठेवली आहे. मराठी भाषेची ही अक्षय संपदा जो इंद्रियातीत, इंद्रियांच्या पलीकडे जाऊन नि:संगपणे आस्वादेल, त्यालाच ती प्राप्त होईल.
आता श्रोतेहो एक गोष्ट करा, मी निरूपण करीत असलेली मराठी भाषेची थोरवी ऐकण्याच्याही पलीकडे जाऊन मनाने आत्मरत होऊन आस्वादा. (हा कैवलरस मोदक तुम्ही मनाने अनुभव.)
APPEARS IN
संबंधित प्रश्न
अर्थ स्पष्ट करा.
माझा मराठाचि बोलु कौतुकें । परि अमृतातेंही पैजां जिंके ।
अर्थ स्पष्ट करा.
वेधें परिमळाचें बीक मोडे । जयाचेनि ।।
चौकटी पूर्ण करा.
रसाळ बोलाला या रचनेत दिलेली उपमा _______
चौकटी पूर्ण करा.
सर्व जगाला जागवणारा _______
खालील ओव्यांतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
"तैसें शब्दांचे व्यापकपण। देखिजे असाधारण।
पाहातयां भावाज्ञां फावती गुण। चिंतामणीचे ॥२॥
योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा.
बिकट संकटांना कवीने म्हटले
खालील काव्यपंक्तींतून व्यक्त होणारा अर्थ लिहा.
‘दिवसाही दाटायचा अंधार तेव्हा, शब्दांनीच हातात बिजली दिली.’
खालील काव्यपंक्तींतून व्यक्त होणारा अर्थ लिहा.
'मरणाच्या धारेत सापडलो तेव्हा, शब्दांनीच माझ्याकडे किनारा सरकवला.'
सूचनेप्रमाणे सोडवा.
‘आश्रय’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
सूचनेप्रमाणे सोडवा.
'शब्द' हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
‘एखादी आठवण आग घेऊन धावली, तेव्हाही शब्दांनीच हल्ला झेलला....’ या काव्यपंक्तीतील आशयसौंदर्य स्वभाषेत लिहा.
मी शब्दांत शिरलो आणि स्वत:ला वाचवले : जहर मी प्यालो आणि शब्दांनी ते पचवले.’ या काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
आयुष्यात आलेले नकार कवीने कोणत्या शब्दांत व्यक्त केले आहेत, ते लिहा.
'शब्द म्हणजेच कवीचे सामर्थ्य,' हे विधान स्पष्ट करा.
‘मानवी जीवनातील शब्दांचे अनन्यसाधारण महत्त्व’ तुमच्या शब्दांत लिहा.
योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा
मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी मी सारे सहन करते. म्हणजे-
खालील ओळींतील संकल्पना स्पष्ट करा.
नादाच्या भुलभुलैय्यातून बाहेर न पडणे
खालील ओळींतील संकल्पना स्पष्ट करा.
मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी सारे सहन करणे.
खालील तक्ता पूर्ण करा.
कवितेचा विषय | कवितेतील प्रतीक | कवितेचा रचनाप्रकार | कवितेची मध्यवर्ती कल्पना | कवितेची भाषाशैली |
‘अगं पायाखालचे काटे मोडण्यासारखे पायच होऊ देत आता... घट्ट, मजबूत, पोलादी’, या ओळींतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा.
कवितेत वर्णन केलेली आजी व आजची आजी यांच्यात कालपरत्वे झालेला बदल स्वभाषेत स्पष्ट करा.
स्त्रीच्या भविष्यकालीन प्रगत रूपांविषयी तुमच्या कल्पना स्पष्ट करा.
पैंजण’ या कवितेचे रसग्रहण करा.