Advertisements
Advertisements
प्रश्न
अन्नसाखळी नष्ट झाल्याचे दुष्परिणाम विज्ञान अभ्यासातून स्पष्ट होण्यासाठी आंतरजालाची मदत घ्या.
उत्तर
वनस्पती शाकाहारी प्राणी खातात. या शाकाहारी प्राण्यांवर मांसाहारी प्राणी जगतात. अशी ही अन्नसाखळी आहे. एकमेकांवर अवलंबून जीवनचक्र चालू आहे. या निसर्गाच्या परिसंस्थेत प्रत्येकाच एक नातं विणलेलं असतं.
निसर्गाचे सृष्टी भांडार टिकवण्यासाठी वन व वन्यजीव यांचे संवर्धन व संरक्षण व्हावे. वन व वन्यजीव मानवी विकासाचे बळी जाऊ नये. वने समृद्ध होण्यासाठी वनातील अन्नासाखळी महत्त्वाची आहे. सजीवसृष्टीत प्राणी आणि मनुष्य संबंध अनादी काळापासून असून ते वृद्धिंगत व्हावे. घटते पर्जन्य, बदलते हवामान याचा परिणाम मानवावर होतोय तसा तो वन आणि वन्यजीवांवरही होतो.
बेसुमार वाढलेली लोकसंख्या त्यांच्या वाढत्या गरजा, आधुनिक जीवनशैली यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीला ओरबाडणे सुरू झाले. वन्यजीव, विविध वृक्ष नष्ट होऊ लागले. जंगले कमी झाली. त्या ठिकाणी हवा, पाणी, ध्वनी प्रदूषणात वाढ झाली. त्यामुळे 'समृद्ध वने' ही संकल्पना लयास जाऊन ओसाड वने उभी राहिली.
चित्ता जसा नामशेष झाला तसे इतर प्राणी नामशेष होता कामा नये. वन व वन्यजीव रक्षण करण्याची वेळ आली आहे. जंगलातील अन्नसाखळी निर्माण करावी लागणार आहे. त्यासाठी हिरवा चारा व फळे, फुले, असणारी देशी वृक्षांची लागवड आवश्यक आहे. शासनाने या गोष्टी केल्या नाही तर जंगलात भक्ष्य मिळत नसल्याने मानवी वस्तीकडे हिंस्र प्राण्यांचे होणारे अतिक्रमण रोखणं अवघड होणार आहे. वने व अन्नसाखळी टिकली तरच पर्यावरणाचे पर्यायाने मानवाचे अस्तित्व राहील.