Advertisements
Advertisements
प्रश्न
'अनु' या व्यक्तिरेखेबद्दल थोडक्यात लिहा.
उत्तर
अनू ही कथेची नायिका असून, ती इतर तरुणींप्रमाणे साधीसुधी नाही. तिचे व्यक्तिमत्त्व वेगळ्या रसायनाने तयार झाले आहे. पहिल्या दृष्टीक्षेपात ती तऱ्हेवाईक किंवा विक्षिप्त वाटू शकते, पण प्रत्यक्षात तशी नाही. ती स्वतंत्र विचारांची तरुणी आहे, जिला कोणाच्याही प्रभावाखाली राहायचे नाही. स्वतःचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी आणि विचारसरणी विकसित करण्यासाठी ती पाच वर्षे स्वतंत्रपणे जगण्याचा निर्णय घेते.
स्वतःच्या बुद्धीने समाज आणि माणसं समजून घेण्यासाठी ती घरापासून दूर राहण्याचा निर्णय घेते. घरात राहिल्यास आई-वडील, भावंडे, नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या आधारावर जीवन जगले जाते. अशा वेळी आपले विचार स्वतंत्र राहत नाहीत आणि निर्णयस्वातंत्र्य कमी होते, जे बौद्धिक पारतंत्र्य ठरते. अनूला हे मान्य नाही. समाज समजून घ्यायचा असेल, तर त्यात मिसळले पाहिजे, म्हणून ती नोकरी करण्याचा निर्णय घेते. सेवाभाव असलेला नर्सिंग हा व्यवसाय तिला योग्य वाटतो आणि त्यामुळेच ती नर्स होते. रुग्णांच्या भावनिक जगात स्वतःला गुंतवून घेत ती पूर्ण समर्पित होऊन कार्य करते. अशा प्रकारे, अनू आपले आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व घडवत जाते.