Advertisements
Advertisements
प्रश्न
बातमीवर आधारित वृत्तलेखाचे स्वरूप लिहा.
उत्तर
एखाद्या घटनेच्या, बातमीच्या संदर्भाने हा लेख लिहिलेला असतो. ज्या घटनेवर लेख लिहायचा आहे, त्या घटनेचा विस्ताराने विचार करावा लागतो. मात्र जी बातमी वर्तमानपत्रात छापून आलेली असते, तिच्यातील सर्व माहिती वृत्तलेखात नसते. तर त्या बातमीतील महत्त्वाच्या मुद्द्यांवर अशा वृत्तलेखात प्रकाश टाकला जातो. वृत्तलेखात त्या बातमीतील मुद्द्यांचे विश्लेषण केले जाते. लिहिणाऱ्याकडे त्या विषयाच्या संदर्भाने असलेली ताजी, स्वतंत्र माहिती असते. अनेकदा वृत्तलेख लिहिताना तज्ज्ञांशी बोलून, घटनेचा तळ गाठून लेखन करावे लागते. त्यामुळे वाचकांना नवे काही मिळाल्याचा आनंद असतो. वृत्तलेखासाठी विषयाच्या मर्यादा नसतात. तो राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, शहरी, ग्रामीण, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक, राजकीय अशा विविध विषयांवर लिहिला जाऊ शकतो. उदा., पर्यावरण, दिल्लीतील वाढते प्रदूषण- कारणे आणि त्याचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम, दळणवळणावरील गुंतवणूक, ग्रामीण भागातील पशुधनाची घटलेली संख्या व त्याचा समाजजीवनावर होणारा परिणाम.