हिंदी

भारतात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कोणत्या योजना राबवल्या गेल्या? - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

प्रश्न

भारतात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कोणत्या योजना राबवल्या गेल्या?

संक्षेप में उत्तर

उत्तर

सुशिक्षित तरुणांना रोजगार उपलब्ध करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी भारत सरकारने वेळोवेळी विविध प्रकारच्या रोजगार योजना राबवल्या. या योजना पुढीलप्रमाणे -

(अ) प्रधानमंत्री रोजगार योजना :

(१) भारत सरकारच्या वाणिज्य व उदयोग मंत्रालयाने २ ऑक्टोबर १९९३ रोजी 'प्रधानमंत्री रोजगार योजना' व 'रोजगार हमी योजना' सुरू केल्या .

(२) रोजगार हमी योजनेत कृषी क्षेत्रातील बेरोजगारांना वर्षातून किमान १०० दिवस रोजगार उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले.

(३) २००१ मध्ये ही योजना 'ग्रामीण रोजगार योजने'त विलीन करण्यात आली.

(ब) सुवर्णजयंती ग्रामीण स्वयंरोजगार योजना :

(१) १९९९ मध्ये सुरू केलेल्या या योजनेत स्वयंरोजगारासाठी ग्रामीण युवकांकरिता प्रशिक्षणाचा कार्यक्रम समाविष्ट केला गेला.

(२) एकात्मिक ग्रामीण विकास योजना, ग्रामीण महिला व बालविकास कार्यक्रम, अवजार वाटप कार्यक्रम अशा विविध योजना या सुवर्णजयंती योजनेत समाविष्ट करण्यात आल्या.

(क) जवाहर ग्राम-समृद्धी योजना :

(१) ग्रामीण भागातील बेरोजगार स्त्री-पुरुषांना पुरेसा रोजगार देण्यासाठी शासनाने १९९९ मध्ये जवाहर ग्राम-समृद्धी योजना सुरू केली.

(२) २००१ मध्ये या योजनेचे संपूर्ण ग्रामीण रोजगार योजने 'त विलीनीकरण करण्यात आले.

(ड) संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना :

(१) 'रोजगार आश्वासन योजना' आणि 'जवाहर ग्राम-समृद्धी योजना' यांचे एकत्रीकरण करून 'संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना' तयार करण्यात आली.

(२) ग्रामीण भागांत रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणे, जलसंवर्धन व शेतीविकास करणे ही या योजनेची उद्दिष्टे होती.

(ई) राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी :

(१) २००६ मध्ये संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना या योजनेत समाविष्ट केली गेली. ग्रामीण भागातील आर्थिक विषमता, दारिद्रय, बेरोजगारी यांचे निर्मूलन करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली.

(२) एका कुटुंबात एका व्यक्तीस वर्षभरात किमान १०० दिवस काम करण्याची हमी या योजनेत देण्यात आली आहे.

shaalaa.com
विविध क्षेत्रांतील बदल - ग्रामीण भागाच्या विकासाच्या योजना
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 11: बदलता भारत - भाग १ - स्वाध्याय [पृष्ठ ८९]

APPEARS IN

बालभारती History [Marathi] 12 Standard HSC Maharashtra State Board
अध्याय 11 बदलता भारत - भाग १
स्वाध्याय | Q ६ | पृष्ठ ८९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×