Advertisements
Advertisements
प्रश्न
भारतातील सर्वात प्रभावी मराठी सत्ता का संपुष्टात आली?
उत्तर
भारतातील सर्वांत प्रभावी असलेल्या मराठी सत्तेच्या अंताची कारणे -
(१) नानासाहेब पेशवे यांनी इंग्रजांची मदत घेतल्यामुळे त्यांना मराठ्यांच्या राज्यकारभारात प्रवेश मिळाला.
(२) रघुनाथराव यांनी पेशवेपदासाठी इंग्रजांकडे मदत मागितली व ते इंग्रजांच्या आश्रयाला गेले.
(३) नाना फडणविसाने इंग्रजांविरुद्ध उभ्या केलेल्या चतुःसंघातून इंग्रजांनी निजामाला फोडून आपल्या गोटात घेतले.
(४) मराठ्यांनी खड्याच्या लढाईत निजामाचा पराभव केला तरीही या लढाईत मराठ्यांच्या छावणीत असलेल्या इंग्रज वकिलाने मराठ्यांच्या युद्धपद्धतीचा अभ्यास करून त्या आधारे लॉर्ड वेलस्ली याने मराठ्यांचा पराभव केला.
(५) हिंदुस्थानात इंग्रजांची सत्ता स्थापन करायची असेल तर मराठ्यांचा पराभव केला पाहिजे, असे वॉरन हेस्टिंग्जच्या लक्षात आल्यावर, त्याने त्याप्रमाणे योजना आखल्या.
(६) मराठा सरदारांना एकत्र आणून मुत्सद्दीपणाने कारभार करणाऱ्या नाना फडणविसांचा मृत्यू झाला.
(७) दुसरा बाजीराव पेशवा मराठा सरदारांना एकत्र ठेवू शकला नाही.
(८) इंदौरचे होळकर व पेशवा यांच्यात आलेल्या वितुष्टामुळे यशवंतराव होळकर याने पुण्यावर आक्रमण केले.
(९) दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांच्या आश्रयाला जाऊन त्यांच्याशी वसईचा तह केला.
(१०) शिंदे-होळकर यांना हा तह अमान्य होऊन १८०३ साली झालेल्या दुसऱ्या इंग्रज-मराठे युद्धात मराठा सरदारांचा पराभव झाला.
(११) १८१७ साली झालेल्या तिसऱ्या युद्धात इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव केला. १८१८ साली मराठ्यांची सत्ता संपुष्टात आली.