Advertisements
Advertisements
प्रश्न
भारतीय लोक राष्ट्रीय चळवळीत मोठ्या संख्येने का सामील झाले?
उत्तर
(१) पहिल्या महायुद्धात सहभागी होण्याचा आपल्याला भविष्यात फायदा होईल, ही राष्ट्रीय सभेची आशा फोल ठरली. त्यामुळे दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी राष्ट्रीय सभेने स्वातंत्र्याची मागणी नेटाने पुढे केली.
(२) इंग्लंडला युद्धकाळात मनुष्यबळाची व पैशांची गरज निर्माण झाली.
(३) सरकारने भारतात लष्करभरती सुरू केली. प्रसंगी त्यात सक्तीही केली.
(४) पैसा उभारणीसाठी जनतेवर जादा कर लादले. व्यापार व उदयोगांवर मोठ्या प्रमाणात कर वाढवले.
(५) युद्धकाळात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या. महागाई वाढली.
(६) औद्योगिक मंदीमुळे बेकारीचे प्रमाण वाढले.
(७) भारतातील या सर्व परिस्थितीला ब्रिटिशांचे आर्थिक शोषणाचे धोरणच कारणीभूत आहे, याची जाणीव भारतीयांना झाली.
(८) राष्ट्रीय सभेने इंग्लंडला आर्थिक सहकार्याच्या बदल्यात स्वातंत्र्याची केलेली मागणी इंग्लंडने फेटाळली.
(९) राष्ट्रीय सभेने स्वातंत्र्याची चळवळ तीव्र केली.
(१०) कामगार, शेतकरी व मध्यम वर्गीय हे सर्व ब्रिटिश सत्तेच्या विरोधात राष्ट्रीय चळवळीत मोठ्या संख्येने सहभागी झाले.