Advertisements
Advertisements
प्रश्न
'भाषेतील सौंदर्य' या दृष्टीने पाठातील वाक्ये शोधून लिहा.
उदा., निसर्गाच्या लडिवाळ मांडीवर विसावलेल्या खेड्यांचा जीवनक्रम सौंदर्याने माखलेला असतो.
लघु उत्तरीय
उत्तर
- अगदी पहाटेलाही अजून पुरती जाग आलेली नसते.
- घराघरांतल्या बायका कोंबड्याच्या बांगेबरोबर जाग्या होऊन चिमणीच्या प्रकाशात गच्च अंधाराला पातळ करत, झोपलेल्या जात्याला गायला लावतात.
- अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकावा लाभलेला असल्याने घरातल्या साऱ्या वस्तूंना स्वप्निल रूप प्राप्त झालेले असते.
- थोड्या वेळाने दिशांना आकार येत जातो.
- व्हायोलिनवर हलक्या हाताने तारा छेडाव्यात तशी चिमण्यांची नाजूक चिवचिव सूरू झालेली असते.
- मध्येच एखाद्या ढोलीतून हिरव्या रेघोट्या मारत एखादा पोपट या संगीतात आपल्या सुराची भर घालत असतो.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?