Advertisements
Advertisements
प्रश्न
भूपृष्ठावर ठेवलेल्या दृश्य प्रकाश दुर्बिणी वापरण्यात येणाऱ्या अडचणी कोणत्या? या अडचणी कशा दूर करता येतात?
संक्षेप में उत्तर
उत्तर
भूपृष्ठावर ठेवलेल्या दृश्य प्रकाश दुर्बिणी वापरण्यात येणाऱ्या अडचणी:
- पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचणाऱ्या प्रकाशकिरणांची तीव्रता कमी होते कारण काही प्रकाश वातावरणाद्वारे शोषला जातो.
- वातावरणातील तापमान व दाब यांच्यातील बदलांमुळे वातावरणात खळबळ होत असेल तर त्यातून येणारे दृश्यप्रकाश किरण स्थिर राहात नाहीत.
- दिवसा सूर्यप्रकाश असल्याने दृश्य प्रकाश दुर्बिणीचा वापर आपण करू शकत नाही.
- ढगाळलेले वातावरण, रात्रीच्या वेळी शहरातील दिव्यांचा प्रकाश यांच्यामुळे खगोलीय वस्तूंचे निरीक्षण करण्यात अडचणी येतात.
या अडचणी खालीलप्रकारे दूर करता येतात:
- या अडचणी कमी करण्यासाठी दृश्य प्रकाशाच्या दुर्बिणी पहाडांवर निर्जन जागी स्थापन करण्यात येतात.
- वरील सर्व अडचणी पूर्णपणे टाळायच्या असतील तर अशी दृश्यप्रकाश दुर्बीण अवकाशातच बसवायला हवी.
shaalaa.com
दुर्बिणीचे प्रकार: दृश्य प्रकाश दुर्बीण
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?