हिंदी

चैत्रातल्या पिंपळाच्या नवपालवीच्या रूपाचे सौंदर्य तुमच्या शब्दांत लिहा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

चैत्रातल्या पिंपळाच्या नवपालवीच्या रूपाचे सौंदर्य तुमच्या शब्दांत लिहा.

संक्षेप में उत्तर

उत्तर

चैत्रात नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या, विविध रंगांच्या फुलांनी डवरून गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन घडले की समजावे हा वसंत ऋतू आला. वसंत ऋतूची सुरुवात फाल्गुनात होते. चैत्रामध्ये वसंत ऋतु ऐन भरात आलेला असतो, त्यातही पिंपळाची पालवी डोळ्यांचे पारणे फेडून टाकते. हिरव्या-पोपटी रंगांच्या अनेक छटा झाडांवर लहरत असतात. पिंपळाचे झाड जसजसे या नवपल्लवांनी डवरून जाते, तसतशी ही गहिऱ्या गुलाबी रंगाची पाने उन्हात झळाळू लागतात. जणू काही गुलाबी रंगाचे सुंदर सुंदर गेंदच झाडावर फुलले आहेत, असा भास होऊ लागतो. हे दृश्यरूप डोळ्यांत साठवता साठवता पानांची सळसळ ऐकावी ते पिंपळाचीच. किंबहुना पिंपळ पानांच्या सळसळीवरूनच 'झाडांच्या पानांची सळसळ' हा शब्दप्रयोग रूढ झाला आहे. आनंददायक, आल्हाददायक, मनमोहक, मनोरम, हृदयंगम, विलोभनीय, नितांत रमणीय, रम्य ही सर्व विशेषण चित्र महिन्यातील पालवीने डवरलेल्या पिंपळाला एकाच वेळी लावता येतील.

shaalaa.com
वसंतहृदय चैत्र
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5.1: वसंतहृदय चैत्र - कृती [पृष्ठ १४]

APPEARS IN

बालभारती Marathi - Kumarbharati 10 Standard SSC Maharashtra State Board
अध्याय 5.1 वसंतहृदय चैत्र
कृती | Q (९) (अ) | पृष्ठ १४

संबंधित प्रश्न

योग्य जोड्या जुळवा.

‘अ’ गट ‘ब’ गट
(१) लांबलचक देठ  (अ) माडाच्या लोंब्या
(२) अर्धवर्तुळ, पांढरी टोपी  (आ) कैऱ्याचे गोळे
(३) भुरभुरणारे जावळ  (इ) करंजाची कळी

पाठाच्या (वसंतहृदय चैत्र) आधारे दिलेल्या वैशिष्ट्यावरून झाडाचे नाव लिहा.

वैशिष्ट्ये : गुलाबी रंगांची कोवळी पालवी

झाडाचे/वेलीचे नाव : ______


पाठाच्या (वसंतहृदय चैत्र) आधारे दिलेल्या वैशिष्ट्यावरून झाडाचे नाव लिहा.

वैशिष्ट्ये : गुलाबी गेंद

झाडाचे/वेलीचे नाव : ______


पाठाच्या (वसंतहृदय चैत्र) आधारे दिलेल्या वैशिष्ट्यावरून झाडाचे नाव लिहा.

वैशिष्ट्ये : कडवट उग्र वास

झाडाचे/वेलीचे नाव : ______


पाठाच्या (वसंतहृदय चैत्र) आधारे दिलेल्या वैशिष्ट्यावरून झाडाचे नाव लिहा.

वैशिष्ट्ये : दुरंगी फुले

झाडाचे/वेलीचे नाव : ______


पाठाच्या (वसंतहृदय चैत्र) आधारे दिलेल्या वैशिष्ट्यावरून झाडाचे नाव लिहा.

वैशिष्ट्ये : तीन पाकळ्यांचे फूल

झाडाचे/वेलीचे नाव : ______


पाठाच्या (वसंतहृदय चैत्र) आधारे दिलेल्या वैशिष्ट्यावरून झाडाचे नाव लिहा.

वैशिष्ट्ये : पायापासून डोकीपर्यंत लादली गेलेली फळ

झाडाचे/वेलीचे नाव : ______


खालील संकल्पनेचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

चैत्र हा खरा वसंतात्मा, मधुमास आहे


खालील संकल्पनेचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

काळीकबरी घरटी चित्रलिपीतली सुंदर विरामचिन्हे वाटतात.


चैत्र महिन्यातील पक्ष्यांच्या घरट्यांना लेखिका वसंताच्या चित्रलिपीतली विरामचिन्हे म्हणतात, या विधानाची सत्यता पटवून द्या.


वसंतऋतूशी निगडित तुमची एखादी आठवण समर्पक शब्दांत लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×