हिंदी

चौकटी पूर्ण करा. (2) अभंगात वर्णिलेला चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी - ______ चिरकाल टिकणारा आनंद - ______ जेवीं चंद्रकिरण चकोरांसी। पांखोवा जेवीं पिलियांसी। -

Advertisements
Advertisements

प्रश्न

कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१. चौकटी पूर्ण करा. (2)

  1. अभंगात वर्णिलेला चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी - ______
  2. चिरकाल टिकणारा आनंद - ______

जेवीं चंद्रकिरण चकोरांसी। पांखोवा जेवीं पिलियांसी।

जीवन जैसे कां जीवांसी। तेवीं सर्वांसी मृदुत्व।।

जळ वरिवरी क्षाळी मळ। योगिया सबाह्य करी निर्मळ।

उदक सुखी करी एक वेळ। योगी सर्वकाळ सुखदाता।।

उदकाचें सुख तें किती। सवेंचि क्षणें तृषितें होती।

योगिया दे स्वानंदतृप्ती। सुखासी विकृती पैं नाही।।

उदकाची जे मधुरता। ते रसनेसीचि तत्त्वतां।

योगियांचे गोडपण पाहतां। होय निवविता सर्वेंद्रियां।।

मेघमुखें अध:पतन। उदकाचें देखोनि जाण।

अध:पातें निवती जन। अन्नदान सकळांसी।।

तैसे योगियासी खालुतें येणें। जे इहलोकीं जन्म पावणें।

जन निववी श्रवणकीर्तनें। निजज्ञानें उद्‌धरी।।

२. आकृती पूर्ण करा. (2)

३. प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा. (2)

  1. उदक -
  2. स्वानंदतृप्ती - 
  3. मृदुत्व - 
  4. इहलोकीं - 

४. काव्यसौंदर्य: (2)

योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे, या वाक्याचे अर्थसौंदर्य स्पष्ट करा.

संक्षेप में उत्तर

उत्तर

१. चौकटी पूर्ण करा. (2)

  1. अभंगात वर्णिलेला चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी - चकोर
  2. चिरकाल टिकणारा आनंद - स्वानंदतृप्ती

२.

३. 

  1. उदक - पाणी सोडणे, त्याग करणे
  2. स्वानंदतृप्ती - आत्मानंदतृप्ती
  3. मृदुत्व - मऊपणा, नरमपणा 
  4. इहलोकीं - येथे, या मृत्यलोकी

४. ‘योगी सर्वकाळ सुखदाता’ हा संत एकनाथ महाराजांनी लिहिलेल्म अभंग आहे. या अभंगात एकनाथ महाराजांनी योगी पुरुष आणि पाणी यांच्यातील फरक सांगितला आहे. यासाठी त्यांनी विविध दृष्टांत दिले आहेत. तसे वरवर पाहिले तर पाणी आणि योगी पुरुषांचे व्यक्तिमत्त्व एकसारखे वाटते, परंतु पाणी हे फक्त तहान भागविते तर योगी पुरुष चिरंतन सुख प्राप्त करून देतो. पाण्यामुळे मिळणारे सुख क्षणभंगुर असते तर योगी चिरकाल टाकणाऱ्या सुखाकडे घेऊन जातो. पाण्याची गोडी फक्त जिभेद्वारेच अनुभवता येते तर योगी पुरुषांच्या सहवासातील आनंद, गोडवा सर्व इंद्रियांना अनुभवता येतो. सुख प्राप्त करून देतो. अशाप्रकारे योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहेत हे संत एकनाथांनी सिद्ध करून दाखविले आहे.

shaalaa.com
योगी सर्वकाळ सुखदाता
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×