Advertisements
Advertisements
प्रश्न
कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१. चौकटी पूर्ण करा. (2)
- दारिद्र्याकडे गहाण पडलेले - ______
- कवीचा जवळचा मित्र - ______
दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले. हे हात माझे सर्वस्व; दारिद्र्याकडे गहाणच राहिले दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो |
२. आकृती पूर्ण करा. (2)
३. प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा. (2)
- फुलले -
- धुंद -
- झोतभट्टी -
- पोलाद -
४. काव्यसौंदर्य: (2)
‘हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे’, या ओळीतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर
१.
- दारिद्र्याकडे गहाण पडलेले - हात
- कवीचा जवळचा मित्र - अश्रू
२.
३.
- फुलले - उमललेले
- धुंद - उन्मत
- झोतभट्टी - अग्नीच्या मोठी ज्वालाची भट्टी
- पोलाद - कठीण व लवचीक केलेले लोखंड
४. वरील ओळी कवी नारायण सुर्वे यांनी लिहिलेल्या ‘दोन दिवस’ या कवितेतील आहे.
या कवितेत कवीने कामगारांच्या आयुष्यातील वास्तव परिस्थिती व कामगारांच्या मनातील व्यथा यांचे चित्रण केले आहे.
दुःख गिळून जगण्याची उमेद निर्माण करणारी ही कविता आहे. आयुष्यात सदैव दु:खच वाट्याला आल्यामुळे पुढे कधीतरी सुखाचे दिवस येतील असा आशावाद कवीने व्यक्त केला आहे. आपल्या नशिबात अजून किती दिवस कष्ट आहेत हे अजमावताना कवी म्हणतो. अजून डोईवर उन्हाळे आहेत याचा हिशोब करतो. कारण कष्टापासून सुटका तर नाहीच; पण त्याच्या मनात येते. आपल्या वाट्याला असे किती कष्ट व दुःख येणार आहे.
या ओळीमुळे कामगारांच्या-कष्टकऱ्यांच्या जीवनातील भयाण वास्तवता आपल्या काळजाला भिडते आणि आपण अंतर्मुख होतो.