Advertisements
Advertisements
प्रश्न
ढगांचे प्रकार लिहा.
दीर्घउत्तर
उत्तर
- जास्त उचीवरील ढग: ढगांची उची ७००० ते १४००० मी. या ढगांमध्ये हिम स्फटीकांचे प्रमाण जास्त असते. यांचे वर्गीकरण सिरस, सिरो क्युम्युलस आणि सिरो स्ट्रेटस या प्रकारांमध्ये केले जाते. सिरस हे मुख्यतः तंतुमय असतात. सिरो क्युम्युलस या ढगांचे स्वरूप लहान लहान लाटांच्या समूहासारखे दिसते. सिरो स्ट्रेटस हे वळ्या पडलेल्या चादरीसारखे दिसतात. यांच्यामधोती बरेचदा तेजोमंडल असते.
- मध्यम उंचीवरील ढग: ढगांची उंची २००० ते ७००० मी. यात अल्टो क्युम्युलस व अल्टो स्ट्रेटस या ढगांचा समावेश होतो. अल्टो क्युम्युलस हे स्तरांच्या स्वरूपात असून यांचीही तरंगांसारखी रचना असते. बहुधा हे पांढऱ्या रंगाचे असून त्यात काळ्या रंगाच्या छटा असतात. अल्टो स्ट्रेटस ढग हे कमी जाडीचे ठर असतात. यातून सूर्यदर्शन होऊ शकते, मात्र सूर्यदर्शन हे दुधी काचेतून पाहिल्यासारखे दिसते.
- कमी उंचीवरील ढग: २००० मी पेक्षा कमी उंची. यात पाच वेगवेगळे प्रकार केले जातात. स्ट्रॅटो क्युम्युलस या ढगात थर असतात. त्यांचा रंग पांढरा ते धूरकट असा असतो. यात ढगांचे अनेक गोलाकार पुंजके आढळतात. स्ट्रेटस ढगात देखील थर असतात. यांचा रंग राखाडी असतो व तळाकडील भाग एकसमान असतो. निम्बो स्ट्रेटस हे ढग जाड थरांचे असतात. गडद राखाडी रंगाचे असून यापासून रिमझिम पाऊस तसेच हिमवर्षाव होतो.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 6.1: आर्द्रता व ढग - स्वाध्याय [पृष्ठ १५९]