Advertisements
Advertisements
प्रश्न
दिलेल्या माहितीच्या आधारे खालील रिकाम्या चौकटींत योग्य संख्या भरा.
एका दलालामार्फत श्रीमती दीपांजली यांनी 7,50,000 रुपये किमतीचे घर श्रीमती लीलाबेन यांच्याकडून खरेदी केले. दलालाने दोघींकडून प्रत्येकी 2% दलाली घेतली. तर
(1) श्रीमती दीपांजली यांनी घर खरेदीसाठी `square xx square/square = square` रुपये दलाली दिली.
(2) लीलाबेन यांनी घर विक्रीसाठी `square` रुपये दलाली दिली.
(3) दलालास या व्यवहारांत एकूण `square` रुपये दलाली मिळाली.
(4) श्रीमती दीपांजली यांना ते घर `square` रुपयांस मिळाले.
(5) श्रीमती लीलाबेन यांना घर विकून `square` रुपये मिळाले.
उत्तर
(1) श्रीमती दीपांजली यांनी घर खरेदीसाठी `bb(750000 xx 2/100 = 15,000)` रुपये दलाली दिली.
(2) लीलाबेन यांनी घर विक्रीसाठी 15,000 रुपये दलाली दिली.
(3) दलालास या व्यवहारांत एकूण 15,000 + 15,000 = 30,000 रुपये दलाली मिळाली.
(4) श्रीमती दीपांजली यांना ते घर 7,50,000 + 15,000 = 7,65,000 रुपयांस मिळाले.
(5) श्रीमती लीलाबेन यांना घर विकून 7,50,000 − ₹ 15,000 = 7,35,000 रुपये मिळाले.