Advertisements
Advertisements
प्रश्न
दिलेल्या सूचनांप्रमाणे खालील वाक्यांत बदल करा.
संजू क्रिकेट खेळतो. (वाक्य भविष्यकाळी करा.)
उत्तर
संजू क्रिकेट खेळेल.
संबंधित प्रश्न
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्य पुन्हा लिहा.
घराभोवती दिव्यांचा झगमगाट पाहायला सारे गाव लोटले.
खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द बनवा.
प्रत्येक दारी-
गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. तो शब्द गटात का बसत नाही ते सांगा.
गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. तो शब्द गटात का बसत नाही ते सांगा.
खालील वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य सर्वनाम लिहा.
आज ______ खूप मजा केली.
खालील दिलेली क्रियाविशेषण अव्यय वापरून वाक्य पूर्ण करा.
______ हिरवेगार गवत उगवले होते.
खालील चौकोनांतील अक्षरांमध्ये क्रियाविशेषण अव्यये लपलेली आहेत. उभ्या, आडव्या व तिरप्या पद्धतीने अक्षरे घेऊन क्रियाविशेषण अव्यये बनवा.
खाली दिलेल्या शब्दाचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा.
उदा., खजूर (कामगार) - मजूर
घागर (समुद्र) - ......
खाली दोन प्रकारचे शब्दसमूह दिलेले आहेत, ते वाचा. कोणत्या शब्दसमूहांचा अर्थ कळतो व कोणत्या शब्दांवरून कळतो ते समजून घ्या.
शब्दसमूह | शब्दसमूह | शब्दसमूहाचा अर्थ कळतो तो शब्द |
१. मारियाने कुलूप | मारियाने कुलूप उघडले. | उघडले |
२. मारियाने दारे, खिडक्या | मारियाने दारे, खिडक्या बंद केल्या. | बंद केल्या |
३. मारिया आईला | मारिया आईला बिलगली. | बिलगली |
मागील तक्त्यातील दुसऱ्या शब्दसमूहांत कोणती क्रिया झाली हे दाखवणारे शब्द दिले आहेत. उदा., उघडले, बंद केल्या, बिलगली. क्रिया सांगणाऱ्या या शब्दांमुळे वाक्यांचा अर्थ कळतो. या शब्दांना क्रियापद म्हणतात.
खालील शब्द वाचा.
कुस्ती, मुक्काम, पुष्कळ, शिस्त, दुष्काळ, पुस्तक, चिठ्ठी, डुक्कर, बिल्ला, चिक्की.
वरील प्रत्येक उदाहरणात एक जोडाक्षर आहे. या जोडाक्षरयुक्त अक्षरापूर्वीच्या अक्षराचे नीट निरीक्षण करा. काय आढळले? या अक्षरांतील उकार, इकार हे ऱ्हस्व आहेत.
मराठी शब्दांत जोडाक्षर असल्यास जोडाक्षरापूर्वीचे इकार, उकार, सामान्यत: ऱ्हस्व असतात.
लक्षात ठेवा: तत्सम शब्दांतील जोडाक्षरापूर्वीचे इकार व उकार ऱ्हस्व व दीर्घ अशा दोन्ही प्रकारचे आढळतात.
उदा., पुण्य, तीक्ष्ण, पूज्य
वर दिलेल्या वर्णनानुसार किमान दहा शब्द लिहा.