Advertisements
Advertisements
प्रश्न
एक फासा टाकला असता पुढील घटनेची संभाव्यता काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
घटना A: वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे.
कृती: समजा, ‘S’ नमुना अवकाश आहे.
S = {1, 2, 3, 4, 5, 6} ∴ n(S) = 6
घटना A: वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे.
A = {______} ∴ n(A) = 3
P(A) = `square/("n"("S"))` ...........[सूत्र]
= `square/6`
∴ P(A) = `1/square`
उत्तर
समजा, ‘S’ नमुना अवकाश आहे.
S = {1, 2, 3, 4, 5, 6}
∴ n(S) = 6
घटना A: वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे.
A = {2, 3, 5}
∴ n(A) = 3
P(A) = `(underline("n"("A")))/("n"("S"))` ...........[सूत्र]
= `underline(3)/6`
∴ P(A) = `1/underline(2)`
APPEARS IN
संबंधित प्रश्न
योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला, तर पुढील घटनेची संभाव्यता काढा.
i) घटना A: तो पत्ता लाल असणे.
कृती: समजा, नमुना अवकाश 'S’ आहे.
∴ n(S) = 52
घटना A : काढलेला पत्ता लाल असणे.
∴ एकूण लाल पत्ते = `square` चौकट पत्ते + 13 बदाम पत्ते
∴ n(A) = `square`
∴ P(A) = `square/("n"("S"))` ..............[सूत्र]
P(A) = `26/52`
P(A) = `square`
दोन फासे एकाचवेळी टाकले असता खालील घटनांची संभाव्यता काढा.
i) घटना A: पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे.
ii) घटना B: पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 33 असणे.
दोन फासे एकाच वेळी टाकले असता खालील घटनाची संभाव्यता काढा.
पहिल्या फाशावरील अंक दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा असणे.
अंकांची पुनरावृत्ती न करता 2, 3, 5, 7, 9 या अंकांपासून दोन अंकी संख्या तयार केली, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.
ती संख्या विषम असेल.
एका हॉकी संघात 6 बचाव करणारे, 4 आक्रमक व एक गोलरक्षक असे खेळाडू आहेत. यादृच्छिक पद्धतीने त्यांतील एक खेळाडू संघनायक म्हणून निवडायचा आहे, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.
गोलरक्षक हा संघनायक असणे.
प्रात्येक कार्डावर एक याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेली सहा कार्डे खोक्यात ठेवली आहेत, तर खालील घटनेची संभाव्यता काढा.
काढलेल्या कार्डावरील संख्या ही नैसर्गिक संख्या असणे.
एका फाशाच्या पृष्ठभागावर 0, 1, 2, 3, 4, 5 या संख्या आहेत. हा फासा दोनदा फेकला, तर वरच्या पृष्ठांवर मिळालेल्या संख्यांचा गुणाकार शून्य असण्याची संभाव्यता काढा.
एका बॅगेत 3 लाल, 3 पांढरे व 3 हिरवे चेंडू आहेत. बॅगेतून 1 चेंडू यादृच्छिक पद्धतीने काढला असता खालील घटनेची संभाव्यता काढा.
काढलेला चेंडू लाल असणे.
एका बॅगेत 3 लाल, 3 पांढरे व 3 हिरवे चेंडू आहेत. बॅगेतून 1 चेंडू यादृच्छिक पद्धतीने काढला असता खालील घटनेची संभाव्यता काढा.
काढलेला चेंडू लाल किंवा पांढरा असणे
एक नाणे व एक फासा एकाच वेळी फेकले असता खालील घटनाची संभाव्यता काढा:
घटना A : छाप व मूळ संख्या मिळणे अशी आहे.