Advertisements
Advertisements
प्रश्न
एका वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे. त्या वर्तुळात प्रत्येकी 16 सेमी लांबीच्या दोन जीवा आहेत, तर त्या जीवा वर्तुळकेंद्रापासून किती अंतरावर असतील?
योग
उत्तर
समजा, O वर्तुळकेंद्र असून जीवा AB व जीवा CD या एकरूप जीवा आहे.
रेख OM ⊥ जीवा AB अशी आहे की, A-M-B
व रेख ON ⊥ जीवा CD अशी आहे की, C-N-D
OB = OD = 10 सेमी ...(वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे.)
AB = CD = 16 सेमी …(पक्ष)
∴ MB = `1/2` AB ...(वर्तुळकेंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो.)
∴ MB = `1/2 xx 16`
∴ MB = 8 सेमी
∆OMB मध्ये, पायथागोरसच्या प्रमेयानुसार,
OB2 = OM2 + MB2
∴ 102 = OM2 + 82
∴ OM2 = 100 – 64
∴ OM2 = 36
दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन,
∴ OM = `sqrt(36)`
∴ OM = 6 सेमी
∴ ON = OM ...(वर्तुळातील एकरूप जीवा वर्तुळकेंद्रापासून समान अंतरावर असतात.)
∴ ON = 6 सेमी
shaalaa.com
एकरूप जीवांचे गुणधर्म
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?