Advertisements
Advertisements
प्रश्न
'गोधडीचे आत्मकथन' या विषयावर दहा ते पंधरा ओळी निबंध लिहा.
उत्तर
गोधडीचे आत्मकथन
माझे नाव गोधडी. मला वाकळ असेही म्हणतात. माझा जन्म एका गरीब शेतमजुराच्या घरी झाला. श्रीमंत लोकांच्या घरी मी कधीच जन्म घेत नाही. माझ्या झोपडीच्या अवतीभवती अशाच शेतमजुरांची घरे आहेत. आमच्या घरी एक लहानगे बाळ होते. एकदा गंमतच झाली. ते बाळ अचानकच खूप रडू लागले. आईने त्याला दूध देण्याचा प्रयत्न केला पण त्याने ते नाकारले. त्याचे आपले रडणे सुरूच होते. मग आईने त्याला कोणतेतरी खेळणे दिले. तेही त्याने घेतले नाही. मग तिने त्याला आपल्या पोटाशी घट्ट धरले. तेव्हा त्याने रडणे थांबवले. आईच्या लक्षात आले की त्याला थंडी वाजत असावी. तिने मला त्याच्यावर पांघरले आणि तो चक्क हसला. रात्रभर तो माझ्या कुशीतच दडून होता. माझ्या जन्माचीही एक कहाणी आहे. आईने खूप साऱ्या चिंध्या गोळा केल्या. त्यात तिच्या कधीकाळी आवडीचे पण आता जीर्ण होऊन चिंध्या चिंध्या झालेले तिचे लुगडे होते. बाबांच्या सदऱ्याचे तुकडे होते. मामानं तिला घेऊन दिलेल्या लुगड्याच्या चिंध्या होत्या. त्या तिने एकत्र गोळा केल्या. त्यातून माझा जन्म झाला. मला झोपडीतच राहणे आवडते. कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांसारखा माझाही अनुभव आहे.
"राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या.”