Advertisements
Advertisements
प्रश्न
घाटातून जाताना घ्यायची काळजी याविषयीचे सूचनाफलक तयार करा.
उत्तर
- आवश्यक तेथेच हॉर्न वाजवा.
- वाहने हळू चालवा, जीवनरेखा वाढवा.
- वाहने चालवताना मोबाइलचा वापर टाळा.
- वळणावर गाडी थांबवणे टाळा. वाहतुकीचे नियम पाळा.
- प्रखर दिव्यांचा आवश्यक तेथेच वापर करा, अपघात टाळा.
- ओव्हरटेक करणे टाळा. अपघातापासून दूर पळा.
- अतिघाई संकटात नेई.
संबंधित प्रश्न
रानमेवा कशाला म्हणतात? रानमेव्यात कोणती फळे येतात, याविषयी कुटुंबातील व्यक्तींशी चर्चा करा.
तुमच्या शाळेमध्ये उन्हाळी सुट्टीत ‘हस्ताक्षर सुंदर करूया!’ हे १० दिवसांचे शिबिर आयोजित केले आहे. त्यात तुम्हांला सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र वर्ग शिक्षकांना लिहा.
तुमच्या परिसरातील एखाद्या अनुभवी शेतकऱ्याची तुम्हांला मुलाखत घ्यायची आहे. त्यासाठी प्रश्नावली तयार करा.
माहिती देण्यासाठी किंवा घेण्यासाठी अनेक साधने वापरली जातात. खाली माहिती देवाणघेवाण करण्याची/संवादाची काही साधने दिली आहेत. त्यांतील काही साधने एकतर्फी व दुतर्फी माहितीची/संवादाची देवाणघेवाण करतात. त्यांची माहिती मिळवा व दिलेल्या तक्त्यात वर्गीकरण करा.
फॅक्स, पत्र, इ-मेल, मोबाइल, आंतरजाल, रेडिओ, वर्तमानपत्र, मोबाइल संदेश, चर्चा, मुलाखत, जाहिरात, भाषण, संभाषण.
एकतर्फी माहितीची/संवादाची साधने | दुतर्फी माहितीची/संवादाची साधने |
खालील सूचना वाचा. अशा आणखी सूचना तयार करा.
- नदीच्या पाण्यात केरकचरा, निर्माल्य टाकू नये.
- ओला कचरा, सुका कचरा ठेवा वेगवेगळा, तरच प्रदूषणाला बसेल आळा.
मराठी भाषेत विनोदी लेखन करणाऱ्या लेखकांची व त्यांच्या साहित्याची शिक्षक, पालक यांच्या मदतीने यादी करा. विनोदी गोष्टी वाचा व वर्गात सांगा.
शब्दांमुळे, भाषेमुळे दैनंदिन व्यवहारात कोणते फायदे होतात, या विषयावर मित्रांशी चर्चा करा.
खालील मुद्यांच्या आधारे अर्थपूर्ण परिच्छेद तयार करा व त्याला योग्य शीर्षक द्या.
सकाळची वेळ ...... बाबांबरोबर फिरायला ...... झाडांवर बसलेले पाखरांचे थवे ...... किलबिल ...... शुद्ध हवा ...... आल्हाददायक वातावरण ...... बाबांशी गप्पा मारत घराकडे परतणे ...... दिवसभर ताजेतवाने वाटणे.
तुमचा आवडता मित्र/मैत्रीण यांमधील तुम्हांला कोणते गुण सर्वांत जास्त आवडतात?
खालील प्रसंगी तुम्ही काय कराल?
तुमच्या मित्राने/मैत्रिणीने आज डबा आणला नाही.