Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील मुद्द्यांच्या आधारे गोष्ट पूर्ण करा.
हट्टी राजकन्या | त्याला अर्धे राज्य मिळते |
`↓` | `↑` |
राज्यकन्येची अट | शेतकऱ्याचा मुलगा येतो |
`↓` | `↑` |
न संपणारी गोष्ट सांगणे | बरेच जण प्रयत्न करतात |
`↓` | `↑` |
राज्यात दवंडी अर्धे राज्य |
उत्तर
न संपणारी गोष्ट
श्रीरामपूर नावाचं गाव होत. तेथे हर्षवर्धन नावाचा राजा राज्य करीत होता. तो आपल्या प्रजेवर मुलाप्रमाणे प्रेम करत होता. प्रजादेखील राजाला मान देत होती. राजाला एक मुलगी होती. ती फार हट्टी होती. ती हट्टी राजकन्या म्हणून सर्वत्र प्रसिद्ध होती. ही राजकन्या आता मोठी झाली होती. म्हणून राजाने तिचे लग्न करावयाचे ठरविले. तेव्हा तिने अट घातली की जो मला न संपणारी गोष्ट सांगेल त्याच्याशीच मी लग्न करेन. या गोष्टीचे राजाला आश्चर्य वाटले.
राजाने दुसऱ्या दिवशी राज्यात दवंडी पेटवली की, “जो कोणी राजकन्येला न संपणारी गोष्ट सांगेल त्याच्याशीच राजकन्येचा विवाह होईल आणि त्याला अर्धे राज्य मिळेल. पण गोष्ट सांगताना ही संपली तर त्याला सुळावर चढवले जाईल.” ही दवंडी ऐकून बरेच जण राजकन्येला गोष्ट सांगू लागले. पण सात-आठ दिवसानंतरच ती संपू लागले.
राज्यामध्ये एका शेतकऱ्याचा हुशार मुलगा होता. त्याने राजाला सांगितले की मी राजकन्येला न संपणारी गोष्ट सांगतो. राजाने त्याला या आधी कितीजण सुळावर चढले आहेत ते सांगितले. पण तो मुलगा गोष्ट सांगण्यास तयार झालाच. तो राजकन्येला गोष्ट सांगू लागला, “एक धान्याचे कोठार होते. त्यात खूप गहू भरून ठेवले होते. त्या कोठाराता वरती एक भोक होते. या भोकातून रोज एक चिमणी आत येत असे आणि चोचीत एक दाणा भरून आपला पिलांना देत असे. पुन्हा त्या भोकातून ती चिमणी कोठरात जाई, एक दाणा चोचीत घेऊन आपल्या पिलांना देत होती. असे तो रोज त्या राजकन्येला सांगू लागला. “तेव्हा राजकन्या कंटाळली आणि तिला आपली चूक समजली. तिने आपला हट्ट सोडून दिला. राजा खुश झाला. त्याने राजकन्याचे लग्न त्या मुलाशी करून दिले आणि अटी प्रमाणे अर्धे राज्य त्याला देऊन टाकले.