Advertisements
Advertisements
प्रश्न
इंग्रजांचे आशिया खंडातील वसाहतवादी धोरण स्पष्ट करा:
(अ) नेपाळ
(ब) सिक्कीम
(क) भूटान
स्पष्ट कीजिए
उत्तर
ब्रिटिशांनी आशियामध्ये, विशेषतः हिमालयीन प्रदेशात, व्यापार, लष्करी आणि सामाजिक लाभ मिळवण्यासाठी आपली सत्ता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने विस्तारवादी आणि वसाहतवादी धोरणाचा अवलंब केला.
(अ) नेपाळ:
- हिमालयाच्या कुशीत वसलेले नेपाळ हे एक छोटे राष्ट्र आहे. ब्रिटिशांनी आपले प्रतिनिधी नेपाळमध्ये पाठवले होते. परंतु ब्रिटिशांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यातूनच इंग्लंडविरुद्ध नेपाळ अशी दोन युद्धे झाली.
- नेपाळी १० ते १२ हजार तर इंग्रजांची फौज ३० हजाराच्या पुढे होती. नेपाळवर इंग्रजांनी आक्रमण केले. नेपाळी सैन्याने इंग्रजांना जेरीस आणले. इंग्रजांनी १८१६ मध्ये नेपाळचा मकवानपूर येथे पराभव केला.
- त्यानंतर झालेल्या तहानुसार इंग्रजांनी तराई, कुमाऊँ, गढवाल हे प्रदेश ताब्यात घेतले. काठमांडू येथे इंग्रज रेसिडेंट नेमला गेला. १९२३ मध्ये इंग्रजांनी नेपाळच्या सार्वभौमत्वाला मान्यता दिली.
(ब) सिक्कीम:
- भारताच्या आसपासचा प्रदेश आपल्या वर्चस्वाखाली आणणे हे ब्रिटिशांचे उद्दिष्ट होते. १८१५ मध्ये सिक्कीमच्या राजाने दार्जिलिंग भोवतालचा प्रदेश ब्रिटिशांकडे सुपूर्द केला. पुढे लॉर्ड डलहौसी याने सैन्य पाठवून सिक्कीमचा आणखी काही प्रदेश ताब्यात घेतला. त्यामुळे सिक्कीम इंग्रज व्यापाऱ्यांसाठी खुले झाले.
- १८८६ मध्ये तिबेटी लोकांनी सिक्कीमवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करताच इंग्रजांनी तिबेटी लोकांविरुद्ध कारवाई सुरू केली. १८९० मध्ये ब्रिटिश-चीन तहानुसार सिक्कीम इंग्रजांचे संरक्षित राष्ट्र असल्याचे मान्य करण्यात आले. दार्जिलिंग परिसरातील चहाचे मळे संरक्षित ठेवणे इंग्रजांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. सिक्कीमला मध्यगत राष्ट्र (बफर झोन) बनवून त्याचे अंतर्गत प्रशासन व परराष्ट्र धोरण इंग्रजांनी स्वतःच्या ताब्यात घेतले. परंतु सिक्कीमचा दर्जा मात्र एक स्वतंत्र राज्य म्हणून राहिला.
- १९७५ मध्ये सिक्कीमच्या जनतेने भारतीय संघराज्यात. सामील होण्याच्या बाजूने मतदान केले आणि त्यानुसार सिक्कीमला भारतीय संघराज्यात घटकराज्याचा दर्जा मिळाला.
(क) भूटान:
- भारताच्या उत्तर सीमा भागात आणि सिक्कीमच्या पूर्वेला भूटान हा देश आहे. या प्रदेशाचे भौगोलिक आणि व्यापारी महत्त्व जाणून वॉरन हेस्टिंग्ज याने भूटानशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे बंगाल ते तिबेट हा भूटानच्या प्रदेशातून जाणारा व्यापारी मार्ग खुला झाला.
- १८४१ मध्ये ॲशले एडन याने भूटानविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला. १८६५ मध्ये भूटान विरुद्ध इंग्रज असे युद्ध झाले. त्यानंतर झालेल्या तहानुसार भूटानने जिंकून घेतलेले प्रदेश ब्रिटिशांच्या हवाली करणे आणि त्या मोबदल्यात ब्रिटिशांनी भूटानच्या राजाला वार्षिक तनखा देणे या दोन गोष्टी ठरवल्या गेल्या.
- १९१० च्या तहानुसार भूटानच्या राजाने संरक्षण व परराष्ट्र धोरणाचे अधिकार इंग्रजांना दिले. इंग्रजांनी भूटानच्या अंतर्गत कारभारात ढवळाढवळ न करण्याचे मान्य केले. ८ ऑगस्ट १९४९ रोजी भारत आणि भूटान यांच्यामध्ये झालेल्या करारान्वये भूटानचे परराष्ट्र धोरण आणि संरक्षणासंबंधीची धोरणे यांमध्ये भारताची भूमिका सल्लागार राष्ट्राची आहे.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?