Advertisements
Advertisements
प्रश्न
इंटरनेट, मोबाइल फोन्स यांच्या सतत संपर्कात राहिल्याने व्यक्तिंमध्ये कोणकोणते बदल घडतात?
संक्षेप में उत्तर
उत्तर
- इंटरनेट, मोबाइल फोन्स यांच्या सतत संपर्कात राहिल्याने लोकांवर शारीरिक, मानसिक आणि सामाजिक परिणाम होतात.
- मोबाइल फोन्सच्या प्रारणांमुळे शारीरिक समस्या देखील निर्माण होतात. थकवा, डोकेदुखी, निद्रानाश, विस्मरण, कानांत आवाज घुमणे, सांधेदुखी व त्याचबरावेर दृष्टिदोष असे शारीरिक त्रास उद्भवतात.
- एकसारखे इंटरनेटवर असल्याने ते एकलकोंडे होतात. त्यांना आपल्या वेळेचे नियोजन करता येत नाही. रोजची कामे सोडून ते आपल्या वेळेचा भरपूर अपव्यय करतात.
- एकलकोंडेपणामुळे समाजातील इतर व्यक्ती, नातेवाईक यांच्याशी सुसंवाद साधणे जमत नाही. फक्त स्वतःचाच विचार करण्याची सवय लागून त्यांच्यामध्ये आत्मकेंद्रीपणा निर्माण होतो.
- अशा व्यक्ती सामाजिक जबाबदाऱ्या घेऊ शकत नाहीत. त्यांचे सामाजिक आरोग्य धोक्यात येते.
shaalaa.com
प्रसारमाध्यमे व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अतिवापर (Media and overuse of modern Technology)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी _____ हा कायदा आहे.
सायबर गुन्ह्यांच्या घटनांमुळे सामान्य माणसाला कोणकोणत्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागते?
प्रत्येकी तीन उदाहरणे द्या.
मोबाइल फोन्सच्या अतिवापरामुळे उद्भवणारे शारीरिक त्रास
प्रत्येकी तीन उदाहरणे द्या.
सायबर गुन्ह्याच्या कक्षेत येणाऱ्या कृती
तुम्ही काय कराल? का?
तुमचा बराच मोकळा वेळ इंटरनेट/मोबाइल गेम्स, फोन यासाठी खर्च होतो आहे.
तुम्ही काय कराल? का?
तुमच्या मित्राला सतत सेल्फी काढायचा छंद लागला आहे.
मोबाइल फोनच्या अतिवापरामुळे उद्भवणारे शारीरिक त्रास खालीलपैकी कोणते?
कार्टून पाहणारी मुलं कधीतरी त्यामधील पात्रांप्रमाणे वागू लागतात.
रस्त्यावर सेल्फी काढणे म्हणजे अपघाताला निमंत्रण होय.
(चूक की बरोबर ते लिहा)