Advertisements
Advertisements
प्रश्न
जागृती युवा प्रबोधिनी, काष्टी आयोजित विद्यार्थ्यांसाठी मॅरेथॉन स्पर्धा दिनांक - 10 जानेवारी, वेळ - स. 7.00 आकर्षक पारितोषिके नावनोंदणी सुरू वयोगट - 10 ते 15 वर्षे संपर्क - श्री. सोहम शिरगावकर, आयोजक, मॅरेथॉन स्पर्धा. ई-मेल - [email protected] |
इशान/इरा रेगे विदयार्थी प्रतिनिधी, (आनंदक्षण विद्यालय, काष्टी) या नात्याने प्रस्तुत स्पर्धेकरिता शाळेतील वीस विदयार्थ्यांच्या नावनोंदणीसाठी विनंती करणारे पत्र आयोजकांना लिहा.
उत्तर
दिनांक - 1 जानेवारी 2025
प्रति,
मा. आयोजक,
श्री. सोहम शिरगावकर,
जागृती युवा प्रबोधिनी, काष्टी
विषय - मॅरेथॉन स्पर्धेत नाव नोंदवण्याबाबत.
महोदय,
मी इरा रेगे, आनंदक्षण विद्यालयाची विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने, मा. मुख्याध्यापकांच्या परवानगीने हे पत्र आपणांस लिहीत आहे. आपल्या जागृती युवा प्रबोधिनी द्वारा आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत आमच्या विद्यालयातील पाच विद्यार्थी सहभागी होऊ इच्छितात. आपण या स्पर्धेसाठी त्यांची नावे नोंदवून घ्यावीत व त्यांना आपले कौशल्य सादर करण्याची संधी द्यावी ही नम्र विनंती.
सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे:
नाव | इयत्ता |
सुमित पाटील | आठवी |
रमेश देशमुख | नववी |
संकेत पवार | नववी |
तेजल कदम | आठवी |
निशा सावंत | नववी |
आपण दिलेल्या वेळेपूर्वी हे सर्व विद्यार्थी हुतात्मा सभागृहात हजर राहतील. आपण आमच्या विनंतीचा नक्की विचार कराल असा विश्वास आहे.
कळावे,
आपली कृपाभिलाषी,
इरा रेगे,
विद्यार्थी प्रतिनिधी,
आनंदक्षण विद्यालय,
काष्टी
[email protected]