Advertisements
Advertisements
प्रश्न
‘जगणं कॅक्टसचं’ या पाठाच्या आधारे कॅक्टसच्या प्रकारांची माहिती थोडक्यात लिहा.
संक्षेप में उत्तर
उत्तर
‘जगणं कॅक्टसचं’ या पाठात वसंत शिरवाडकर यांनी वाळवंटी प्रदेशातील काटेरी आणि कमी पाण्यावर जगणारी वनस्पती म्हणजे कॅक्टस यांची माहिती दिली आहे. शिरवाडकर म्हणतात, थोड्याशा पाण्यावर कसे वाढावे याचा नमुना दाखविण्यासाठीच निसर्गाने कॅक्टसची निर्मिती केली आहे. या कॅक्टसच्या अनेक जाती आहेत. त्यांपैकी काही प्रमुख जाती (प्रकार) पुढीलप्रमाणे:
- सग्वारो कॅक्टस - सग्वारो कॅक्टस याला कॅक्टसचा राजा म्हटले जाते. त्याची उंची पन्नास फुटापर्यंत वाढते. त्याची वाढ खूप मंद असते की पन्नास वर्षात फक्त तीन फूटच वाढ होते आणि त्याचे आयुष्य दोनशे वर्षे असते.
- सायाळ कॅक्टस - कुंपणाच्या आश्रयाने राहणाऱ्या सायाळासारखा दिसतो. म्हणून याला सायाळ कॅक्टस असे म्हणतात.
- अस्वल कॅक्टस - अस्वलासारखा दिसतो म्हणून अस्वल कॅक्टस असे म्हणतात.
- पिंप कॅक्टस - पिंपासारखा दिसतो म्हणून पिंप कॅक्टस असे म्हणतात.
- सांबरशिंग कॅक्टस - सांबराच्या शिंगासारख्या दिसाणाऱ्या कॅक्टसला सांबरशिंग कॅक्टस असे म्हणतात.
अशाप्रकारे कॅक्टसच्या सुमारे एक हजार जाती आहेत.
shaalaa.com
जगणं कॅक्टसचं
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?