Advertisements
Advertisements
प्रश्न
झालर क्षेत्रांमध्ये ग्रामीण आणि नागरी दोन्ही वस्त्यांची वैशिष्ट्ये आढळतात.
टिप्पणी लिखिए
उत्तर
शहरांचे क्षेत्र जिथे संपते तिथून मोकळी जागा किंवा ग्रामीण क्षेत्राची सीमा सुरू होते. अशा ग्रामीण आणि शहरी क्षेत्राच्या मधील भागाला झालर क्षेत्र म्हणतात. झालर क्षेत्र हे एक प्रकारे दोन्ही वस्त्यांचे संक्रमण क्षेत्र असते. बहुतांशी वेळेस झालर क्षेत्रामध्ये नागरी वस्तीचा प्रसार किंवा विस्तार होत जातो. त्यामुळे एकीकडे या झालर क्षेत्रात ग्रामीण भूमी उपयोजनाचा प्रभाव दिसतो. तेथे वनक्षेत्र, कृषिक्षेत्र, जलसाठे असे भूमी आच्छादन आढळते. मात्र, त्याच वेळेस हळूहळू नागरीकरणाच्या प्रभावामुळे निवासी बांधकाम उदयोग, खाणकाम असे नागरी भूमी उपयोजनही दिसू लागते. म्हणूनच झालर क्षेत्रांमध्ये ग्रामीण आणि नागरी अशा दोन्ही वस्त्यांची वैशिष्ट्ये आढळतात.
shaalaa.com
ग्रामीण नागरी झालर क्षेत्र
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?