हिंदी

का ते लिहा. i. भावे सर फक्त भौतिकशास्तराचे शिक्षकच नव्हते, कारण ______ ii. माशेलकरांना जीवनात भरपूर यश व कीर्ती मिळाली, कारण ______ -

Advertisements
Advertisements

प्रश्न

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१. का ते लिहा. (2)

  1. भावे सर फक्त भौतिकशास्तराचे शिक्षकच नव्हते, कारण ______
  2. माशेलकरांना जीवनात भरपूर यश व कीर्ती मिळाली, कारण ______

           याच हायस्कूलमध्ये मला भावे सर भेटले. ते आम्हांला भौतिकशास्त्र शिकवत. विज्ञानातील हा विषय शिकवताना त्यांनी केवळ शास्त्र शिकवलं नाही, तर त्या विषयाची गाेडी लावली आणि त्याचबरोबर जीवनाचं फार मोठं तत्त्वज्ञान शिकवलं.

           एके दिवशी शाळेत त्यांनी एक प्रयोग करून दाखवला. भिंगाच्या साहाय्यानं सूर्यकिरणांची शक्ती कागदावर एकत्र केल्यास कागद जळतो हे त्यांनी दाखवलं आणि माझ्याकडे बघून ते म्हणाले, ‘‘माशेलकर, तुमची ऊर्जाशक्ती एकत्र करा, काहीही जाळता येईल.’’ एकीकडे मला एकाग्रतेचा मंत्र मिळाला आणि दुसरीकडे विज्ञान समजलं.

           आयुष्याचं फार मोठं तत्त्वज्ञान मला भावे सरांच्या या शिकवणुकीतून गवसलं. त्यांना मी कसा विसरू शकेन? भावे सरांप्रमाणेच माझ्या शालेय आणि पुढील शैक्षणिक जीवनात जोशी सर, शिर्के सर, श्री. मालेगाववाला या सर्वांनीच माझ्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीसाठी उत्तम मार्गदर्शन केलं, संस्कार केले. आयुष्याच्या उभारणीसाठी मला याच शाळेने आणि याच शिक्षकांनी भरपूर शिदोरी दिली. संघर्षासाठी आत्मविश्वास मिळवून दिला. जगण्याचे भान दिले. आजही फिरून ते शाळेचे दिवस आठवताना एकीकडे, प्रचंड दारिद्र्याचा सामना करतानाचे क्षण न क्षण आठवतात आणि त्याचवेळी माझी आई, माझे शिक्षक, माझी शाळा हे ‘माझे संस्कार केंद्र’ डोळ्यांसमोर उभे राहते. मी पुन्हा मनोमनी शाळेत जाऊ लागतो.

२. आकृती पूर्ण करा. (2)

३. स्वमत (3)

लेखकांना शैक्षणिक जीवनात मोलाचे साहाय्य करणाऱ्या व्यक्तींबद्दलचे मत स्पष्ट करा.

संक्षेप में उत्तर

उत्तर

१. 

  1. भावे सर फक्त भौतिकशास्तराचे शिक्षकच नव्हते, कारण विषयाव्यतिरिक्त त्यांनी माशेलकरांना जीवनाचं फार मोठं तत्त्वज्ञान पण शिकवलं.
  2. माशेलकरांना जीवनात भरपूर यश व कीर्ती मिळाली, कारण शालेय जीवनात त्यांना आपल्या आई व शिक्षकांकडून व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीसाठी उत्तम मार्गदर्शन व संस्कार मिळाले.

२.

३. लेखकांना हायस्कूलमध्ये असताना भावे सर भेटले. नंतर पुढील शैक्षणिक जीवनात श्री. जोशी सर, श्री. शिर्के सर, श्री. मालेगाववाला सर असे प्रमुख काही शिक्षक भेटले. अन्य काही शिक्षक होतेच. पण लेखकांनी या शिक्षकांच्याबद्दल आपले विशेष मत व्यक्त केले आहे. या शिक्षकांनी त्यांना उत्तम मागदर्शन केले, चांगले संस्कार दिले. संघर्षासाठी आत्मविश्वास निर्माण केला आणि जगण्याचे भान मिळवून या शिदोरीवर त्यांनी आपले जीवन सर्व दृष्टीने यथार्थ करून दाखविले आणि जगामध्ये ते एका अत्युच्च शिखरावर पोहोचले.

shaalaa.com
ऊर्जाशक्तीचा जागर
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×