Advertisements
Advertisements
प्रश्न
का ते लिहा.
महाराणी येसूबाईंच्या नेतृत्वाखाली रायगड लढवावा, असे धोरण ठरवण्यात आले.
कारण बताइए
उत्तर
- संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर मराठ्यांचे राज्य जिंकून घेण्याचे आपले स्वप्न साकार होणार, असे औरंगजेबाला वाटू लागले. म्हणून त्याने रायगडला वेढा घालण्यासाठी झुल्फिकारखानाला पाठवले.
- त्या वेळी राजाराम महाराज व त्यांच्या पत्नी महाराणी ताराबाई तसेच संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई व पुत्र शाहू हे रायगडावरच होते. या सर्वांनी एकाच ठिकाणी राहणे धोक्याचे होते.
- या प्रसंगी येसूबाईंनी या अभूतपूर्व संकटाला धैर्याने तोंड दिले. कोणत्याही परिस्थितीत मुघलांना शरण जायचे नाही, असे ठरवून त्यांनी रायगडावर महत्त्वाचे राजनैतिक निर्णय घेतले.
- त्यानुसार, राजाराम महाराजांनी रायगडाच्या वेढ्यातून बाहेर पडावे आणि आवश्यकता भासल्यास दूरवर जिंजीला जावे, असे ठरले.
अशा प्रकारे, महाराणी येसूबाई यांनी आपल्या नेतृत्वाखाली रायगड लढवावा, असे धोरणही ठरवण्यात आले.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?