Advertisements
Advertisements
प्रश्न
केल्याने देशाटन महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागातर्फे ‘गिर्यारोहण कॅम्प’ विशेष ‘गौरव’ सोहळा |
![]() |
वरील प्रसंगी तुम्ही साकेत किंवा सानिका आहात अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.
उत्तर
‘केल्याने देशाटन’ या उक्तीप्रमाणे मी सानिका, महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागातर्फे गिर्यारोहण कॅम्पमध्ये सह्याद्रीचे सर्वोच्च शिखर ‘कळसूबाई’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या शिखरावर जाण्यासाठी नाव नोंदवून आले. साधारणपणे आठ-दहा दिवसांचा अवधी होता. म्हणून इतर गिर्यारोहणासाठी लागणारे साहित्याची जमाजमव सुरू होती. माझ्या मैत्रिणींना पण याचे आश्चर्य वाटले. त्यांना माझ्या गिर्यारोहणाबद्दल विश्वास नव्हता. म्हणून त्यांनी यामध्ये तज्ज्ञ असलेल्या शिक्षकांचे मार्गदर्शन घेण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे मी भरपूर सराव सुरू केला, माझे मार्गदर्शक शिक्षक श्री. पाटील सर यांनी खूप कष्ट घेऊन मला चांगले तयार केले.
गिर्यारोहणाची तारीख ठरलेली होती. ती जसजशी जवळ येऊ लागली तसतशी मनामध्ये एक वेगळीच भीती येऊ लागली. आपल्याला हे जमेल का? आपण यात यशस्वी होऊ का? वैगैरे शंका व प्रश्न निर्माण होत होते. मी कशाचाही विचार न करता ठरलेल्या तारखेस शिखर चढाईसाठी सज्ज झाले. वातावरण खूपच प्रतिकूल होते. मे महिन्याचे अखेरचे दिवस असल्यामुळे मध्येच पाऊस, मध्येच कडक ऊन अशी विचित्र स्थिती होती. यातूनच मी वर चढाईला सुरूवात केली. शिक्षकाच्या मार्गदर्शनाप्रमाणे मी पुढे-पुढे जात होती. मनात शिखराशिवाय दुसरा कोणताही विचार नव्हता. पुढे-पुढे परिस्थिती अधिकच बिकट होत होती. माझे सहकारी मधूनच मागे फिरले. मी मात्र पुढे बघून चालत होती असे होता-होता एकदम शिखर दिसू लागले आणि नंतर मग मी त्या शिखरावर पोहोचली.
मी शिखरावर पोहोचल्यावर तेथे ध्वज फडकवला. माझ्या नावाची पाटी त्या ठिकाणी रोवली. तेथे अजून काही नावाच्या पाट्या होत्या. आणि नंतर मी परत माघारी यशस्वी होऊन आले. गावात आल्यावर मिरवणूक कडून मला घरी नेले. माझा सफर यशस्वी झाला हि बातमी काही क्षणात सर्वांना समजली.
माझ्या या यशासाठी विशेष गौरव सोहळा आयोजित करण्यात आला. त्याबद्दल मला कळविण्यात आले. ठरल्याप्रमाणे मी त्या सोहळ्यात व्यासपीठावर सत्कार मूर्ती म्हणून बसली होती. माझे शिक्षक, मार्गदर्शक आणि इतर मान्यवरांनी माझ्यावर कौतुकाचा वर्षाव केला. त्याचप्रमाणे इतरांनी पण माझ्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. असा हा अभूतपूर्व सोहळा पाहून माझे मन भरून आले. माझ्या भाषणामध्ये मी शिक्षकांनी आणि मार्गदर्शकांनी कसे प्रोत्साहन दिले, कसे प्रशिक्षण दिले हे सांगितले. खरोखरच मी यांची ऋणी आहे हे कळवून दिले. त्यानंतर आभार प्रदर्शन होऊन कार्यक्रम संपला. हा सोहळा माझ्या जीवनामध्ये अविस्मरणीय ठरला.