हिंदी

खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा. खोद आणखी थोडेसेखाली असतेच पाणीधीर सोडू नको, सारीखोटी नसतात नाणी. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.

खोद आणखी थोडेसे
खाली असतेच पाणी
धीर सोडू नको, सारी
खोटी नसतात नाणी.

संक्षेप में उत्तर

उत्तर

कवयित्री आसावरी काकडे यांच्या ‘खोद आणखी थोडेसे’ या कवितेतून जिद्द, चिकाटी व उमेद बाळगून कष्टाची कास धरली, तर यश प्राप्त होतेच हा अतिशय सकारात्मक संदेश मिळतो. कवयित्री म्हणते, आणखी थोडे खोदलेस, तर पाणी हाती लागेल. म्हणजेच, जिद्दीने थोडा आणखी प्रयत्न केला, तर तुझे साध्य तुला प्राप्त होईल. त्यामुळे, धीर न सोडता उमेदीने पुढे गेले पाहिजे. जीवनात एखादे ध्येय साध्य करायचे असेल, तर संयम, जिद्द, आत्मविश्वास यांसोबतच चिकाटीने कार्यरत राहावे लागते. अपयश ही यशाची पहिली पायरी असते हे प्रत्येकाने मान्य केले पाहिजे. आपण प्रयत्न करणे जेथे थांबवले, तेथूनच चिकाटी धरून आणखी थोडेसे पुढे गेलो, की यश आपलेच असते, हा विचार कवयित्री येथे मांडत आहे. आणखी थोडेसे या शब्दाद्वारे तिला चिकाटी, जिद्द, आशावाद सूचित करायचा आहे. प्रत्येक वेळेला अपयशच हाती येईल किंवा प्रत्येक वेळेस आपण फसवलेच जाऊ असे नसते, हे अधोरेखित करण्यासाठी कवयित्रीने येथे नाण्याचे उदाहरण दिले आहे.

प्रस्तुत कविता अष्टाक्षरी छंदात रचली आहे. अल्पाक्षरत्व हे या कवितेचे वैशिष्ट्य आहे. कवयित्रीने येथे कमीत कमी शब्दांतून खोल अर्थ असलेला आशय व्यक्त केला आहे. अतिशय सूचक व समर्पक उदाहरणाद्वारे कवयित्री आशावादी व सकारात्मक संदेश देते. प्रयत्न, जिद्द, आशावाद ही मूल्ये या काव्यपंक्तीतून कवयित्री सूचित करते.

छोट्या छोट्या काव्यपंक्तीतून येथे एक आंतरिक लय निर्माण झाली आहे. त्यामुळे, ही कविता तालासुरात म्हणता येते.

shaalaa.com
खोद आणखी थोडेसे
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2021-2022 (March) Set 1

संबंधित प्रश्न

आकृती पूर्ण करा.

 


कवितेतील (खोद आणखी थोडेसे) खालील संकल्पना आणि त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा.

कवितेतील संकल्पना  संकल्पनेचा अर्थ
(१) सारी खोटी नसतात नाणी (अ) मनातील विचार व्यक्त करावेत.
(२) घट्ट मिटू नका ओठ (आ) मनातील सामर्थ्य व्यापक बनवावे.
(३) मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली (इ) सगळे लोक फसवे नसतात.
(४) उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी (ई) भ्रामक खोट्या समजुती बाळगू नयेत.

कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.

संयमाने वागा - ______


कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.

उतावळे व्हा - ______ 


कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.

नकारात्मक विचार करा - ______ 


कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.

संवेदनशीलता जपा - ______ 


कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.

जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास कायम ठेवा - ______ 


कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.

जुन्याच निर्मितीवर विश्वास ठेवा - ______ 


कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.

धीर सोडू नका - ______ 


कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.

यशाचा विजयोत्सव करा - ______ 


खालील ओळींचे रसग्रहण करा.

‘झरा लागेलच तिथे, खोद आणखी जरासे’


पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

1. आकृती पूर्ण करा. (२)

2. योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा. (२)

खोदणे या शब्दाचा कवितेतील अर्थ म्हणजे ___________
i. विहीर आणखी खोदणे.
ii. जिद्दीने आणखी प्रयत्न करणे.
iii. घरबांधणीसाठी खोदणे.
iv. वृक्षलागवडीसाठी खोदणे.

खोद आणखी थोडेसे
खाली असतेच पाणी
धीर सोडू नको, सारी
खोटी नसतात नाणी.

घट्ट मिटू नये ओठ
गाणे असते गं मनी
आर्त जन्मांचे असते
रित्या गळणाऱ्या पानी.

मूठ मिटून कशाला
म्हणायचे भरलेली
उघडून ओंजळीत
घ्यावी मनातली तळी.

झरा लागेलच तिथे
खोद आणखी जरासे
उमेदीने जगण्याला
बळ लागते थोडेसे!

3. पुढील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा. (२)

खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी
धीर सोडू नको, सारी खोटी नसतात नाणी.

4. काव्यसाैंदर्य. (२)

'उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे' या काव्यपंक्तीतील विचारसाैंदर्य स्पष्ट करा.


पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

1. खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. (२)

  1. नकारात्मक विचार करा. - ___________
  2. जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास कायम ठेवा - _________

खोद आणखी थोडेसे
खाली असतेच पाणी
धीर सोडू नको, सारी
खोटी नसतात नाणी.

घट्ट मिटू नये ओठ
गाणे असते गं मनी
आर्त जन्मांचे असते
रित्या गळणाऱ्या पानी.

मूठ मिटून कशाला
म्हणायचे भरलेली
उघडून ओंजळीत
घ्यावी मनातली तळी.

झरा लागेलच तिथे
खोद आणखी जरासे
उमेदीने जगण्याला
बळ लागते थोडेसे!

2. तक्ता पूर्ण करा. (२)

कवयित्रीच्या मते काय करावे व काय करू नये ते लिहा.

काय करावे. काय करू नये.
1) 1)
2) 2)

खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा.

खोद आणखी थोडेसे

  1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री.  (1)
  2. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. (1)
  3. प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा. (2)

खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा.

खोद आणखी थोडेसे

  1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री  (१)
  2. प्रस्तुत कवितेचा विषय  (१)
  3. प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा.  (२)

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×