Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील आकृती मध्ये, `square`ABCD हा समांतरभुज आहे. बिंदू P व बिंदू Q हे अनुक्रमे बाजू AB व बाजू DC यांचे मध्यबिंदू आहेत तर सिद्ध करा की, `square`APCQ समांतरभुज आहे.
उत्तर
पक्ष: `square`ABCD हा समांतरभुज आहे. बिंदू P व बिंदू Q हे अनुक्रमे बाजू AB व बाजू DC यांचे मध्यबिंदू आहेत.
साध्य: `square`APCQ समांतरभुज आहे.
सिद्धता:
AP = `1/2` AB ...(i) [P हा रेख AB चा मध्यबिंदू आहे.]
QC = `1/2` DC ...(ii) [Q हा रेख CD चा मध्यबिंदू आहे.]
`square`ABCD हा समांतरभुज आहे.
∴ AB = DC ...[समांतरभुज चौकोनाच्या संमुख भुजा.]
∴ `1/2` AB = `1/2` DC ...(दोन्ही बाजूंना `1/2` ने गुणून)
∴ AP = QC ...(iii) [(i) व (ii) वरून]
त्याचप्रमाणे, AB || DC ...[समांतरभुज चौकोनाच्या संमुख भुजा.]
AP || QC ...(iv) [A–P–B, D–Q–C]
(iii) व (iv) वरून,
AP = QC
AP || QC
चौकोन हा समांतरभुज चौकोन असतो जर त्याच्या विरुद्ध बाजू समांतर आणि एकरूप असतील.
∴ `square`APCQ समांतरभुज आहे.