Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील आलेखाचे निरीक्षण करा. पाण्याचे तापमान 0°C पासून वाढवत नेल्यास त्याच्या आकारमानात होणारा बदल विचारात घेऊन पाणी व इतर पदार्थ यांच्या आचरणात नक्की काय फरक आहे ते स्पष्ट करा. पाण्याच्या या प्रकारच्या आचरणास काय म्हणतात?
उत्तर
पाण्याचे तापमान 0°C पासून वाढवत नेल्यास, 4°C पर्यंत त्याचे आकारमान कमी होत जाते व 4°C ला ते कमीत कमी असते. त्यानंतर त्याचे आकारमान वाढत जाते. सर्वसाधारणपणे इतर पदार्थांच्या बाबतीत मात्र तापमान वाढवत गेल्यास आकारमान सतत वाढतच जाते. या फरकामुळे 0 ते 4°C या तापमानादरम्यानच्या पाण्याच्या आचरणास पाण्याचे असंगत आचरण म्हणतात.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
थंड प्रदेशात जलीय वनस्पती व जलचर यांना जिवंत ठेवण्यात पाण्याच्या असंगत आचरणाची भूमिका स्पष्ट करा.
‘पाण्याच्या असंगत आचरणामुळे खडक फुटून त्याचे तुकडे होतात’ हे वाक्य स्पष्ट करा.
हवेतील दमटपणा किंवा कोरडेपणा _____ वर अवलंबून नसतो.
पाण्याचे तापमान 4°C पेक्षा कमी झाल्यास तिचे आकारमान _____.
थंड प्रदेशातील जलीय प्राणी 4°C तापमानास जिवंत राहू शकतात कारण...
पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास करण्यासाठी _____ याचा उपयोग करतात.
पाण्याच्या असंगत आचरण अभ्यासात होपच्या उपकरणात वरच्या तापमापीचे तापमान : 0°C : : खालच्या तापमापीचे तापमान : _____
नावे लिहा.
पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास ज्या उपकरणाच्या साहाय्याने केला जातो.
होपच्या उपकरणाची नामनिर्देशित आकृती काढा.