Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा.
बालपणातील तुझा उत्साह आणि तुझ्यातील चैतन्य अवर्णनीय होते.
तारुण्यात नवउमेदीने भरलेली, सर्वत्र सहज संचारणारी अशी तू होतीस.
उत्तर
पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका अंगणात दिवे लावावेत तसे सर्वच बहर लावणारी तू नवयौवना
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कृती करा.
आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीच्या पूर्वीच्या स्थितीचे केलेले वर्णन
कृती करा.
आरशातील स्त्रीने आरशाबाहेरच्या स्त्रीला अधिकारवाणीने केलेला उपदेश
वर्णन करा.
आरशातील स्त्रीला आरशाबाहेरील स्त्रीमधील जाणवलेले बदल-
वर्णन करा.
आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीची काढलेली समजूत-
खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा.
आता मात्र तू स्वत:च स्वत:ला संसारात इतकं गुंतवून घेतलं आहेस, की पारंपरिकपणे जगण्याच्या अट्टाहासात तू दिवसरात्र कष्ट सोसत आहेस.
जोड्या जुळवा.
'अ' गट |
‘ब’ गट |
(१) अंतरीचे सुंदर पूर्वरंग | (अ) मनात असलेले प्रचंड दु:ख लपवून ठेवतेस |
(२) आभाळ झुल्यावर झुलणारी | (आ) परंपरेने चालत आलेल्या रीतींना वरदान समजून वागणारी. |
(३) देह तोडलेले फूल | (इ) उच्च ध्येय बाळगण्याचे स्वप्न रंगवणारी |
(४) पारंपरिकतेचे वरदान | (ई) कोमेजलेले किंवा ताजेपणा गेलेले फूल |
(५) पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळा | (उ) मनातले सुंदर भाव |
खालील ओळींचा अर्थ लिहा.
माझेच रूप ल्यालेली, तरीही मी नसलेली
किती बदललीस ग तू अंतर्बाह्य!
खालील ओळींचा अर्थ लिहा.
स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा
नि आज नखशिखांत तू... तू आहेस फक्त स्थितप्रज्ञा राणी!
रसग्रहण.
प्रस्तुत कवितेतील खालील पद्यपंक्तींचे रसग्रहण करा.
तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वत:च हिंदकळतेय
आणि अशातच, ती मला गोंजारीत, जवळ घेत
अधिकारवाणीने म्हणाली-
‘रडू नकोस खुळे, उठ! आणि डोळ्यातले हे आसू
सोडून दे शेजारच्या तळ्यात
नि घेऊन ये हातात
नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले’
अभिव्यक्ती.
‘आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीशी केलेला संवाद हा स्वत:शीच केलेला सार्थ संवाद आहे’, हे विधान स्पष्ट करा.
‘रडू नकोस खुळे, उठ!
आणि डोळ्यातले हे आसू
सोडून दे शेजारच्या तळ्यात
नि घेऊन ये हातात
नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले’
या ओळीतील काव्य सौंदर्य तुमच्या भाषेत लिहा.
अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला
दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला
बागेतली ती अल्लड जाईही पेंगुळतेय तुझी वाट पाहून पाहून
पण तू, तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी
या ओळीचे रसग्रहण करा.
खालील ओळींचा अर्थ लिहा:
आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस
ग मन उलगडून
ओठ मात्र असतात पिळवटलेले, खसकन
देह तोडलेल्या फुलांसारखे,
इतकी कशी वेढून गेलीस या घनगर्द संसारात
जळतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे
वरदान समजून