हिंदी

खालील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा. या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार।। - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.

या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार
नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार।।

टिप्पणी लिखिए

उत्तर

कवी किशोर पाठक यांनी 'स्वप्न करू साकार' या कवितेत देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न चित्रित केले आहे. या कवितेद्वारे कृषिसंस्कृती, श्रमप्रतिष्ठा, एकीचे बळ या मूल्यांचे महत्त्व कवी स्पष्ट करत आहेत. कवी आपल्या देशाचे वर्णन करताना अभिमानाने सांगतात, की या देशाच्या मातीवरती, या मायभूमीवरती आम्हां देशवासियांचा अधिकार आहे. नव्या पिढीचे, भारताच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न आम्ही प्रत्यक्षात आणू, असा निर्धारही ते व्यक्त करतात.

या ओळींद्वारे देशाविषयीचा, आपल्या जन्मभूमीविषयीचा अभिमान व्यक्त होतो. या अभिमानामुळे मायभूमीवरील प्रेमाचा अधिकार कवी सांगतो; पण पुढच्याच ओळींतून तो देशबांधवांना जबाबदारीचेही भान आणून देतो कारण येणाऱ्या नव्या पिढीचे, नव्या युगातील नव्या भारताचे स्वप्न तो पाहत आहे आणि ते प्रत्यक्षात आणण्याची जबाबदारी तो येथे मांडत आहे. 'स्वप्न करू साकार' या शब्दात त्याचा आशावादी, सकारात्मक दृष्टिकोन दिसतो.

shaalaa.com
स्वप्न करू साकार
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 16.1: स्वप्न करू साकार - कृती [पृष्ठ ६०]

APPEARS IN

बालभारती Marathi - Aksharbharati 10 Standard SSC Maharashtra State Board
अध्याय 16.1 स्वप्न करू साकार
कृती | Q (३)(अ) | पृष्ठ ६०

संबंधित प्रश्न

खालील शब्दसमूहातील संकल्पना स्पष्ट करा.

श्रमशक्तीचे मंत्र- 


खालील शब्दसमूहातील संकल्पना स्पष्ट करा.

हस्त शुभंकर - 


आकृतिबंध पूर्ण करा.


आकृतिबंध पूर्ण करा.


कवितेत व्यक्त झालेला एकात्मतेचा विचार स्पष्ट करा.


पद्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०८)

आकलन कृती

 १. जोड्या जुळवा. (०२)

क्र. 'अ' 'ब'
१. सुदर्शन चक्र शुभंकर
२. मंत्र शक्ती
३. नौबत चैतन्य
४. हस्त श्रमशक्ती

 

या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार

नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार।।

फुलामुलांतून हसतो श्रावण

मातीचे हो मंगल तनमन

चैतन्याचे फिरे सुदर्शन

शेतामधुनी पिकवू मोती, धन हे अपरंपार।।

या हातांनी यंत्र डोलते

श्रमशक्तीचे मंत्र बोलते

उद्योगाचे चक्र चालते

आभाळावर उत्क्रांतीचा घुमवू या ललकार।।

हजार आम्ही एकी बळकट

सर्वांचे हो एकच मनगट

शक्तीचीही झडते नौबत

घराघरांतून जन्म घेतसे तेज नवा अवतार।।

या विश्वाची विभव संपदा

जपू वाढवू आम्ही लाखदा

हस्त शुभंकर हवा एकदा

भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जयजयकार।।

२. एका वाक्यात उत्तरे लिहा. (०२)

१. कोणाचे स्वप्न साकार करायचे आहे?

२. शेतातील धान्याला कशाची उपमा दिली आहे?

३. कवितेत आलेल्या खालील शब्दांचा अर्थ लिहा. (०२)

१. मंगल -

२. तन -

३. ललकार -

४. विभव -

४. खालील पंक्तींमधून सूचित होणारा अर्थ लिहा. (०२)

या विश्वाची विभव संपदा

जपू वाढवू आम्ही लाखदा

भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जयजयकार।।


खालील दोन कवितांपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

मुददे 'अंकिला मी दास तुझा' किंवा 'स्वप्न करू साकार'
1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री    
2. प्रस्तुत कवितेचा विषय    
3. प्रस्तुत ओळीचा सरळ अर्थ लिहा. 'अग्निमाजि पडे बाळू । माता धांवें कनवाळू।।' 'हजार आम्ही एकी बळकट सर्वांचे हो एकच मनगट।।'
4. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण    
5. प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा. i. काज - 
ii. सवें -
iii. पाडस -
iv. धेनू -
i. विभव -
ii. मंगल -
iii. श्रम -
iv. हस्त -

किंवा

मुददे 'स्वप्न करू साकार'
1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री  
2. प्रस्तुत कवितेचा विषय  
3. प्रस्तुत ओळीचा सरळ अर्थ लिहा. 'हजार आम्ही एकी बळकट सर्वांचे हो एकच मनगट।।'
4. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण  
5. प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा. i. विभव -
ii. मंगल -
iii. श्रम -
iv. हस्त -

खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधार कृती सोडवा.

मुद्दे ‘स्वप्न करू साकार’
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री  
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय  
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा ‘फुलामुलांतून हसतो श्रावण।
मातीचे हो मंगल तनमन।।’
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण  
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा (i) संपदा -
(ii) बळकट - 
(iii) उत्क्रांती - 
(iv) चैतन्य -

खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

मुद्दे ‘स्वप्न करू साकार’
(1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री -  
(2) प्रस्तुत कवितेचा विषय -  
(3) प्रस्तुत कवितेतील दिलेल्या दोन ओळींचा सरळ अर्थ लिहा. ‘या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार’
(4) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण  
(5) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा. (i) ललकारणे -
(ii) नौबत - 
(iii) विभव - 
(iv) श्रम - 

खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

कृती ‘स्वप्न करू साकार’
(1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री -   
(2) प्रस्तुत कवितेचा विषय -   
(3) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण -   
(4) दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ - 

‘या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार

नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार’

(5) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ -  (i) विभव -
(ii) शक्ती -
(iii) विश्‍व -
(iv) हस्त -

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×