Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील मुद्दयांच्या आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.
'आकाशी झेप घे रे'
- प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री -
- कवितेचा विषय -
- कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे -
लघु उत्तरीय
उत्तर
- कवी - जगदीश खेबुडकर
- या कवितेचा मुख्य विषय असा आहे की, माणसाने परावलंबन टाळून स्वतःच्या क्षमतांवर आणि सामर्थ्यावर विश्वास ठेवावा आणि आपले ध्येय गाठण्यासाठी उंच शिखरे सर करावीत.
- कष्ट आणि स्वावलंबनाचा संदेश देणारी ही कविता अत्यंत प्रेरणादायी आहे. साधी आणि सोपी भाषा तसेच नादमय शब्दांमुळे कविता सहज समजते. कवीने मानवाला स्वतःच्या क्षमतांची जाणीव करून देण्यासाठी पाखराचे समर्पक प्रतीक वापरले आहे, ही कल्पना मला खूप भावली. याशिवाय, धान्याला दिलेली मोत्याची उपमा आणि 'श्रमदेव' ही अनोखी कल्पना मनाला विशेष आकर्षित करते. कविता लयबद्ध असल्याने ती चालीत गाता येते. या सर्व गुणांमुळे ही कविता मला फारच आवडली.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?