हिंदी

खालील मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. क्र. मुद्दे आश्वासक चित्र 1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री - 2. कवितेचा विषय - 3. शब्दांचे अर्थ लिहा. i. झरोक - ______ ii. कसब - ______ - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.

क्र. मुद्दे आश्वासक चित्र
1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री -  
2. कवितेचा विषय -  
3. शब्दांचे अर्थ लिहा. i. झरोक - ______
ii. कसब - ______
सारिणी

उत्तर

क्र. मुद्दे आश्वासक चित्र
1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री - नीरजा
2. कवितेचा विषय - ‘स्त्री-पुरुष समानतेचे आश्वासक चित्र रेखाटणे’ हा कवितेचा विषय आहे.
3. शब्दांचे अर्थ लिहा. i. झरोक - लहान खिडकी
ii. कसब - कौशल्य, कुशलता
shaalaa.com
आश्वासक चित्र
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2021-2022 (March) Set 1

APPEARS IN

संबंधित प्रश्न

कवितेच्या आधारे खालील कोष्टक पूर्ण करा.

कवितेचा विषय  कवितेतील पात्र  कवितेतील मूल्य  आश्वासक चित्र दर्शवणाऱ्या ओळी
       

मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या कवितेतील ओळी शोधा.

(अ) ______
(आ) ______ 


चौकट पूर्ण करा.

कवयित्रीच्या मनातील आशावाद - ______


कवितेतील (आश्वासक चित्र) खालील घटनेतून/विचारातून आढळणारा व्यक्तीचा गुण लिहा.

मांडी घालून मुलगा बसतो गॅससमोर


कवितेतील (आश्वासक चित्र) खालील घटनेतून/विचारातून आढळणारा व्यक्तीचा गुण लिहा.

मी दोन्ही करू शकते एकाच वेळी


कवितेतील (आश्वासक चित्र) खालील घटनेतून/विचारातून आढळणारा व्यक्तीचा गुण लिहा.

जिथे खेळले जातील सारेच खेळ एकाच वेळी


‘ती म्हणते मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. तू करशील?’ या ओळीचा तुम्हांला कळलेला अर्थ स्पष्ट करा.


कवितेतील (आश्वासक चित्र) मुलगा आणि मुलगी कशाचे प्रतिनिधित्व करतात असे तुम्हांला वाटते, तुमच्या शब्दांत लिहा.


‘स्त्री-पुरुष समानते’ बाबत तुम्हांला अपेक्षित असलेले चित्र तुमच्या शब्दांत रेखाटा.


पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१) आकृतिबंध पूर्ण करा.  (२)

२) उत्तरे लिहा.  (२)

  1. मुलगी खेळत असलेले ठिकाण - ______
  2. कवयित्री जेथून पाहते ती जागा - ______

तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून
खेळते आहे एक मुलगी केव्हाची.
मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून.

ती मांडीवर घेते बाहुलीला
एका हातानं थोपटत तिला, चढवते आधण भाताचं
भातुकलीतल्या इवल्याशा गॅसवर.

बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन
खूप उंच उडवून चेंडू नेमका झेलतो तो हातात.

मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे.
अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या.
मुलगा दाखवतो तिला, आपलं कसब पुन्हा एकदा.

मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे
तेव्हा तो हसून म्हणतो,
'तू भाजी बनव छानपैकी पाल्याची.' ती म्हणते,
'मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. तू करशील?'
मुलगा देतो चेंडू तिच्या हातात.

उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून
नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत.
मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित.
तशी हसून म्हणते ती, 'आता तू.'
मांडी घालून मुलगा बसतो गॅससमोर.
दोन्ही हातांनी थोपटत झोपवतो बाहुलीला प्रथम;
मग शोधतो पातेलं भाजीसाठी...

हळूहळू शिकेल तोही
आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं
तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून.

माझ्या घराच्या झरोक्यातून दिसतं आहे
एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं
जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र.
भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात
हातात हात असेल दोघांचाही
ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं.

३) पुढील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा.  (२)

भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात
हातात हात असेल दोघांचाही
ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीन

४) पुढील काव्यपंक्तींतून व्यक्त झालेला विचार तुमच्या शब्दांत लिहा.   (२)

हळूहळू शिकेल तोही
आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं
तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून


खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा.

आश्वासक चित्र

  1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री  (१)
  2. प्रस्तुत कवितेचा विषय  (१)
  3. प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा.  (२)

खालील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.

अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्यांच्या
मुलगा दाखवतो, तिला आपलं कसब पुन्हा एकदा


पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१) कोण ते लिहा. (२)

  1. भातुकलीचा खेळ खेळणारी- ______
  2. चेंडूचा खेळ खेळणारा- ______ 

२) आकृतिबंध पूर्ण करा.  (२)

  1. मुलगी मुलाचा हा खेळ खेळून दाखवते.- ______
  2. मुलगा गॅससमोर बसून ही कृती करतो.- ______

तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून
खेळते आहे एक मुलगी केव्हाची.
मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून.

ती मांडीवर घेते बाहुलीला
एका हातानं थोपटत तिला, चढवते आधण भाताचं
भातुकलीतल्या इवल्याशा गॅसवर.

बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन
खूप उंच उडवून चेंडू नेमका झेलतो तो हातात.

मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे.
अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या.
मुलगा दाखवतो तिला, आपलं कसब पुन्हा एकदा.

मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे
तेव्हा तो हसून म्हणतो,
'तू भाजी बनव छानपैकी पाल्याची.' ती म्हणते,
'मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. तू करशील?'
मुलगा देतो चेंडू तिच्या हातात.

उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून
नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत.
मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित.
तशी हसून म्हणते ती, 'आता तू.'
मांडी घालून मुलगा बसतो गॅससमोर.
दोन्ही हातांनी थोपटत झोपवतो बाहुलीला प्रथम;
मग शोधतो पातेलं भाजीसाठी...

हळूहळू शिकेल तोही
आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं
तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून.

माझ्या घराच्या झरोक्यातून दिसतं आहे
एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं
जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र.
भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात
हातात हात असेल दोघांचाही
ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं.

३) पुढील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा.  (२)

तेव्हा तो हसून म्हणतो,
'तू भाजी बनवू छानपैकी पाल्याची.' ती म्हणते,
'मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. तू करशील?'
मुलगा देतो चेंडू तिच्या हातात.

४) पुढील काव्यपंक्तींतून व्यक्त झालेला विचार तुमच्या शब्दांत लिहा.  (२)

भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात
हातात हात असेल दोघांचाही
ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×