Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील मुद्द्यांच्या आधारे महापुरात अडकलेल्याच्या एका दिवसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा:
उत्तर
एकेदिवशी मी महापुरात अडकलो
पावसाळ्याचे दिवस होते. आम्ही काही मित्र मिळून वर्षासहल आयोजित केली होती. गगनबावडा या तालुक्यातील कासारी या गावी गेलो होती. तीन दिवस त्या परिसरामध्ये होतो. आम्ही गेल्यापासून पावसाचा जोर वाढला होता. म्हणून त्या दिवशी आम्ही गावातच थांबलो होतो. नदीचे पाणी वाढू लागले होते. गावातील लोकांची धावपळ सुरू होती. त्यातच कोणीतरी सांगू लागले की धरणातून पाणी सोडले आहे. सावध रहा. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आम्ही मित्रांनी त्यांना धीर देण्यास सुरुवात केली. नदीकाठच्या लोकांच्या घरात पाणी येऊ लागले होते.
आम्ही मित्रांनी त्या लोकांचे साहित्य जवळच्या टेकडीवरील शाळेत नेऊन ठेवू लागलो. काही जण घराबाहेर येण्यास तयार नव्हते. त्यांची समजूत काढून त्यांना शाळेतील इमारतीमध्ये आणले. तसेच गावातील इतर सखल भागात देखील पाणी येऊ लागले. त्या लोकांनासुद्धा आम्ही बाहेर आणण्यास आणि त्यांचे साहित्य घेऊन जाण्यास मदत करू लागलो. आमचे हे सहकार्य पाहून लोकांना खूप आधार वाटला. आमच्या मदतीला शेजारच्या गावातील पण काही लोक आले. आमची सर्वांची एकच धांदल गडबड उडाली. आम्ही कोणीही यापूर्वी असे एवढे पाणी पाहिले नव्हते. आमच्यापैकी काही जणांना तर पोहतासुद्धा येत नव्हते. गावातल्या बहुतेक सर्वांना पोहता येत होते. त्या लोकांनी पाण्यातून वाटेल तसे धाडसाने इकडे-तिकडे जाऊन खूप सहकार्य केले. बराच वेळ माझ्या मनामध्ये भीती होती. पण मी सर्वांच्या साहाय्याने भीतीला न घाबरता धाडसाने मदत कार्य करीत होतो.
आता बराच वेळ धावपळीमध्ये गेला. कोणाचे खाण्या-पिण्याकडे लक्ष नव्हते. सर्व जण काम करत होते. टेकडीवरील शाळेमध्ये बरीच लहान-थोर मंडळी बसली होती. तेव्हा आता काय करायचे? खाण्या-पिण्याचा प्रश्न होता. गावातील काही श्रीमंत लोकांनी आपल्या घरातील धान्य गोळा केले आणि सर्वांनी ते शाळेत आणले. तरुण मंडळाच्या मुलांनी तेथे जेवणासाठी भांडी आणली. चूल तयार केली. जेवण तयार करून सर्वांना जेवण वाढले. तोपर्यंत रात्र झाली. सर्व जण झोपी गेले. सकाळी पाहतो तो पूर ओसरला होता. सर्व जण आपापल्या घरी गेले. आम्ही ही आमच्या घरी परतलो. हा महापूर मला भरपूर काही सांगून गेला आणि शिकवून गेला.