हिंदी

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा: आदर्श विदयालय, अहमदनगर स्वच्छता सप्ताहानिमित्त विशेष उपक्रम दि. 1 ऑक्टोबर ते दि. 7 ऑक्टोबर - शालेय परिसर स्वच्छता व वर्गखोल्या स्वच्छता - - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा:

आदर्श विदयालय, अहमदनगर

स्वच्छता सप्ताहानिमित्त विशेष उपक्रम

दि. 1 ऑक्टोबर ते दि. 7 ऑक्टोबर

- शालेय परिसर स्वच्छता व वर्गखोल्या स्वच्छता -

विद्यालयात 'स्वच्छतादूत' म्हणून काम केलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार

सत्कार समारंभ - दि. 7 ऑक्टोबर

दु. 4.00

संपर्क - विभाग प्रमुख, स्वच्छता सप्ताह उपक्रम

[email protected]

अमर/अमृता शाह विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने विभागप्रमुखांना स्वच्छता करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी करणारे पत्र लिहा.

लेखन कौशल

उत्तर

दिनांक: २4 सप्टेंबर, २०२४

प्रति,
माननीय विभागप्रमुख,
आदर्श विद्यालय,
महात्मा गांधी मार्ग,
अहमदनगर
इ-मेल - [email protected]

विषय: स्वच्छता सप्ताहानिमित्त स्वच्छता करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी करण्याबाबत.

माननीय महोदय,

मी अमृता शाह, आदर्श विद्यालय, अहमदनगर येथील विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आपल्याला हे पत्र लिहीत आहे. आपल्या विद्यालयात १ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या स्तुत्य स्वच्छता सप्ताह उपक्रमाबाबत मला सांगताना आनंद होत आहे. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून मी सर्व विद्यार्थ्यांना या उपक्रमाबाबत माहिती दिली असून, त्यात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. या विशेष उपक्रमासाठी आम्हाला काही साहित्याची गरज भासत आहे, ज्याची यादी पुढीलप्रमाणे आहे:

क्र. साहित्य संख्या
i. झाडू 10
ii. बादल्या 10
iii. साबण 12
iv. कचऱ्याचे डबे 06
v. खराटा 06

वरील साहित्य लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावे, अशी आपणास विनम्र विनंती आहे.

आपली विश्‍वासू,
अमृता शाह
आदर्श विद्यालय,
अहमदनगर
इ-मेल - [email protected]

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (July) Official

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×