Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
'संस्कृतीसंवर्धन' संस्था आयोजित रांगोळी प्रशिक्षण वर्ग रविवार दि. 13 ऑक्टोबर : वेळ स. 10 ते 5 स्थळ: कलाघर, विवेकानंद मार्ग, पुणे. संपर्क: sanpune08@gmail. com आयोजक |
माधव/माधवी देसाई, नंदादीप विद्यालय, पुणे. विदयार्थी प्रतिनिधी या नात्याने रांगोळी प्रशिक्षण वर्गात सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र आयोजकांना लिहा.
उत्तर
दिनांक: 15 मार्च 2025
प्रति,
संस्कृतिसंवर्धन संस्था,
आयोजक, रांगोळी प्रशिक्षण वर्ग,
पुणे.
विषय: रांगोळी प्रशिक्षण वर्गात सहभागी होण्यासाठी....
आदरणीय महोदय,
मी, माधवी देसाई, नंददीप विद्यालय, पुणे येथील विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून हे पत्र लिहीत आहे. मला समजले आहे की आपली संस्कृतिसंवर्धन संस्था रविवार, दिनांक १३ ऑक्टोबर रोजी रांगोळी प्रशिक्षण वर्ग आयोजित करीत आहे. मला या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे, कारण रांगोळी ही भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाची कला आहे आणि या प्रशिक्षणाद्वारे माझ्या कौशल्यात भर पडेल.
तरी कृपया मला या प्रशिक्षण वर्गात सहभागी होण्याची संधी द्यावी. मला आवश्यक असलेली माहिती आणि नोंदणी प्रक्रियेबाबत कळवावी. माझा सहभाग निश्चित करण्यासाठी मी संपूर्ण वेळेचे पालन करेन व शिस्तबद्धपणे प्रशिक्षण घेईन.
तुमच्या सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे.
धन्यवाद!
आपली विश्वासू,
माधवी देसाई,
नंददीप विद्यालय,
पुणे 400 001,