Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील ओळीचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
हसावं कसं सळसळत्या पानासारखं.
उत्तर
पानांची सळसळ ऐकायला नादमधुर, मंजुळ वाटते. वाऱ्याच्या झुळकीने हलणाऱ्या पानांत सामावलेला नाद झाड दिलखुलासपणे व्यक्त करते. आपणही पानासारखे तितक्याच मनमोकळेपणाने, दिलखुलासपणे हसले पाहिजे, असे कवी वरील काव्यपंक्तींतून सांगू पाहत आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
वाक्य पूर्ण करा.
कवीने झाडाला दिलेली उपमा-
वाक्य पूर्ण करा.
कवीच्या मते उत्साही आयुष्य म्हणजे-
वाक्य पूर्ण करा.
पानझडीनंतरचे, नवी वस्त्रेधारण करणारे झाड म्हणजे-
आकृती पूर्ण करा.
एका वाक्यात उत्तरे लिहा.
झाडाच्या जीवनाचं गाणं कशात दडलेलं असतं?
‘पानझडीनंतर’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
खालील ओळीचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
जगावं कसं तर? हिरवंगार झाडासारखं.
पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा. गुण (०८)
१. चौकट पूर्ण करा. (०२)
झाड बसते ध्यानस्थ ऋषिसारखं मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत... पक्षी झाडांचे कुणीच नसतात तरीही झाड त्यांचं असतं मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब झाडाकडे टक लावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग रक्त होते क्षणभर हिरवेगार आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलासारखं टवटवीत झाडाचे बाहु सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं नव्या नवरीसारखं झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी अन झटकली जाते मरगळ पक्ष्यांच्या मंजुळ नादात झाडाचंही जीवनाचं एक संथ गाणे दडलेले असते हसावं कसं सळसळत्या पानासारखं मुळावं मुरावं कसं तर? झाडासारखं घट्ट पाय रोवीत जगावं कसं तर? हिरवंगार झाडासारखं रोजचं चिंतन करावं कसं तर झाडासारखं! |
२. चौकट पूर्ण करा. (०२)
१. खालील गोष्टी पाहून कवीच्या मनात आलेले विचार लिहा.
अ. हिरवा रंग
आ. झाडांचे बाहु
२. संकल्पना स्पष्ट करा. (०१)
दव
३- शब्दांचे अर्थ
१. कवितेतील पुढील शब्दांचे अर्थ सांगा. (०२)
- गाणे -
- झाड -
- नवरी -
- पक्षी -
४- काव्यसाैंदय
१. ‘अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब’ या ओळीतील विचारसाैंदर्य सांगा. (०२)
पुढील कवितेच्या खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. गुण (०८)
झाड बसते ध्यानस्थ ऋषिसारखं मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत... पक्षी झाडांचे कुणीच नसतात तरीही झाड त्यांचं असतं मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब झाडाकडे टक लावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग रक्त होते क्षणभर हिरवेगार आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलासारखं टवटवीत झाडाचे बाहु सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं नव्या नवरीसारखं झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी अन झटकली जाते मरगळ पक्ष्यांच्या मंजुळ नादात झाडाचंही जीवनाचं एक संथ गाणे दडलेले असते हसावं कसं सळसळत्या पानासारखं मुळावं मुरावं कसं तर? झाडासारखं घट्ट पाय रोवीत जगावं कसं तर? हिरवंगार झाडासारखं रोजचं चिंतन करावं कसं तर झाडासारखं! |
मुद्दे:
१. प्रस्तुत कवितेचे कवी/ कवयित्री- (०१)
२. प्रस्तुत कवितेचा विषय- (०१)
३. कवितेतील दिलेल्या ओळीचा सरळ अर्थ लिहा. (०२)
'हसावं कसं सळसळत्या पानासारखं'
४. कवितेत आलेल्या शब्दांचे अर्थ लिहा. (०२)
- शरीर-
- वस्त्र-
- अलगद-
- मंजुळ-
५. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण- (०२)
६. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश - (०२)
खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दयांच्या आधारे कृती सोडवा.
मुद्दे | ‘हिरवंगार झाडासारखं’ |
(१) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री - | |
(२) कवितेचा रचनाप्रकार - | |
(३) कवितेचा काव्यसंग्रह - | |
(४) कवितेचा विषय - | |
(५) कवितेतील आवडलेली ओळ - | |
(६) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे - |