Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील ओळींचे रसग्रहण करा.
‘घामातुन मोती फुलले
श्रमदेव घरी अवतरले’
उत्तर
आशयसौंदर्य : सुप्रसिद्ध मराठी गीतकार जगदीश खेबुडकर यांची 'आकाशी झेप घे रे' ही मराठी चित्रपटातील एक गीतरचना आहे. स्वसामर्थ्यावर अदम्य विश्वास ठेवून कर्तृत्वाचे मोकळे आकाश ओळखावे आणि ध्येयाकडे उंच भरारी घ्यावी, परावलंबित्व सोडून स्वावलंबी व्हावे, ही या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. स्वकर्तृत्वाने यशाचे शिखर गाठावे व उच्च ध्येयाकडे झेप घ्यावी. पारतंत्र्याचा त्याग करून स्वातंत्र्याचे मोल जाणावे, हा अमूल्य संदेश ही कविता देते.
काव्यसौंदर्य : वरील ओळींमध्ये कवींनी श्रमाचे महत्त्व सांगितले आहे. कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. अविरत प्रयत्न व काबाडकष्ट करून जेव्हा शेतकरी शेतामध्ये खपतो, तेव्हा त्याला मोत्यांसारखे पीक मिळते. त्याच्या घामातून मोती फुलतात. ते धनधान्य त्याच्या घरी येते, तेव्हा त्याच्या श्रमाचे सार्थक होते. जणू श्रमदेव त्याच्या घरी अवतरतात.
भाषिक वैशिष्ट्ये : ध्रुपद व कडवी अशी या गीताची सुटसुटीत रचना आहे. रसाळ शब्दकळा व नेमके मर्म सांगणारी भाषा हे या कवितेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. 'पिंजरा' हे सुखलोलुपतेचे प्रतीक वापरले आहे व त्यात कैद झालेल्या मानवी मनाला 'पक्षी' म्हटले आहे. साध्या शब्दांत गहन आशय मांडला आहे. यमकप्रधान गेय रूपामुळे कविता मनात ठसते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
सुखलोलुप झाली काया म्हणजे ______
पिंजरा सोडून झेप घेतल्याने ______
तुलना करा.
पिंजऱ्यातील पोपट | पिंजऱ्याबाहेरील पोपट |
______ | ______ |
______ | ______ |
______ | ______ |
पाखराला स्वसामर्थ्याची ओळख करून देणाऱ्या कवितेतील (आकाशी झेप घे रे) ओळी शोधून लिहा.
कवीने (आकाशी झेप घे रे) यशप्राप्तीच्या संदर्भांत सांगितलेली सुवचने लिहा.
____________
____________
‘आकाशी झेप घे रे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा’, या ओळीतील मथितार्थ स्पष्ट करा.
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.
आकाशी झेप घे रे
- प्रस्तुत कविता तुम्हाला आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण लिहा. (२)
- प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा. (२)
1. कलंक - ___________
2. सकलकामना - __________
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.
आकाशी झेप घे रे
- प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
- प्रस्तुत कवितेचा विषय. (१)
- प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. (२)
पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. आकृतिबंध पूर्ण करा. (२)
आकाशी झेप घे रे पाखरा तुजभवती वैभव, माया तुज पंख दिले देवाने कष्टाविण फळ ना मिळते घामातुन मोती फुलले |
2. तुलना करा. (२)
पिंजऱ्यातील पोपट | पिंजऱ्याबाहेरील पोपट |
3. पुढील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा. (२)
दरि-डोंगर, हिरवी राने
जा ओलांडुनी या सरिता-सागरा
4. पुढील काव्यपंक्तीतील विचारसाैंदर्य स्पष्ट करा. (२)
कष्टाविण फळ ना मिळते
तुज कळते परि ना वळत
खालील मुद्दयांचा आधारे 'आकाशी झेप घे रे' या कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.
क्र. | प्रश्न | उत्तर |
१ | कवी किंवा कवयित्रीचे नाव. | |
२ | कवितेचा विषय. | |
३ | प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा. उदा. व्यथा, वैभव सुखलोलुप, साजिरा | |
४ | कवितेतून मिळणारा संदेश. | |
५ | प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये लिहा. | |
६ | कवितेतून व्यक्त होणारा विचार लिहा. |
खालील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा.
तुजभवती वैभव, माया
फळ रसाळ मिळते खाया
सुखलोलुप झाली काया
हा कुठवर वेड्या घेसी आसरा
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.
आकाशी झेप घे रे
- प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
- प्रस्तुत कवितेचा विषय. (१)
- प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा. (२)
खालील पंक्तींचे रसग्रहण करा.
‘घामातुन मोती फुलले
श्रमदेव घरी अवतरले
घर प्रसन्नतेने नटले
हा योग जीवनी आला साजिरा’