Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील पानाचे गुणधर्म दिले आहे. गुणधर्मासाठी एक पान शोधून वनस्पतीचे वर्णन लिहा.
गुळगुळीत पृष्ठभाग
लघु उत्तरीय
उत्तर
केळीच्या झाडाला गुळगुळीत पाने असतात. या पानांचे तळ रुंद होऊन एकमेकांभोवती घट्टपणे गुंडाळले जातात. यालाच 'केळीचे खांब' अस म्हणतात. केळीची पाने मऊ, गुळगुळीत आणि मोठी असतात. त्यांचा उपयोग जेवणासाठी पण केला जातो. केळीच्या पानाला धार्मिक कार्यात खूप महत्त्व असते. केळीचे झाड हे जगातील सर्वात मोठी मांसल खोड असलेली सपुष्प वनस्पती आहे. केळीचे झाड कंदापासून निर्माण होते. याचे खोड छद्मखोड असते. केळीच्या झाडाला फूल येते, त्याला केळफूल म्हणतात. केळफुलापासूनच केळ्याचे घड मिळतात. एका घडात साधारणपणे वीस केळी असतात.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?